Thane Fire : उपवन येथील सूर संगीत हॉटेल आणि बारला भीषण आग

संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास ठाण्यातील उपवनच्या गेटजवळ असलेल्या कृष्णा टॉवरच्या पहिल्या मजल्यावर आग (Thane Fire) लागली.

146
Thane Fire
Thane Fire : उपवन येथील सूर संगीत हॉटेल आणि बारला भीषण आग

शुक्रवार ५ मे रोजी ठाण्यातील (Thane Fire) सूर संगीत हॉटेल आणि बारला भीषण आग लागली. संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास ठाण्यातील उपवनच्या गेटजवळ असलेल्या कृष्णा टॉवरच्या पहिल्या मजल्यावर आग (Thane Fire) लागली. या इमारतीच्या तळमजल्यावर सूर संगीत हॉटेल आणि बार आहे. घटनेची माहिती समजताच सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी, वर्तकनगर प्रभाग समितीचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान, ०१-फायर वाहन, ०१- वॉटर टँकर व ०२- रेस्क्यु वाहनासह उपस्थित होते.

(हेही वाचा – Mango : अवकाळी पावसाने आंब्याचे दर गडगडले)

ठाण्यातील नागरिक सध्या अवकाळी पाऊस, उष्माघात, इमारत दुर्घटना यासारख्या गोष्टीनी हैराण झाला आहे. अशातच या लागलेल्या आगीमुळे (Thane Fire) पुन्हा एकदा त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही पहा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.