Reels in Train : लोकल किंवा ट्रेनमध्ये रिल्सचे शूटिंग करता येते का; वाचा…

109
Reels in Train : लोकल किंवा ट्रेनमध्ये रिल्सचे शूटिंग करता येते का; वाचा...
Reels in Train : लोकल किंवा ट्रेनमध्ये रिल्सचे शूटिंग करता येते का; वाचा...

मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये बेली डान्स करणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Reels in Train) असे व्हिडिओ केल्याने इतर प्रवाशांना त्रास तर होतोच शिवाय व्हिडिओ बनवणाऱ्यांच्या जीवाला धोकाही निर्माण होतो. रेल्वेमध्ये किंवा लोकलमध्ये असे शूटिंग करता येते का ? जाणून घेऊया काय आहेत नियम…

(हेही वाचा – Kareena Shaikh : लेडी डॉन करीना शेखला दरोड्याप्रकरणी अटक)

काय आहेत रेल्वेमध्ये शूटिंग करण्याचे नियम

१. धावत्या ट्रेनमध्ये किंवा प्लॅटफॉर्मवर चित्रीकरण करता येत नाही. चित्रीकरणासाठी रेल्वे प्रशासनाची कायदेशीर अनुमती घ्यावी लागते. (Reels in Train)

२. धावत्या ट्रेनमध्ये किंवा प्लॅटफॉर्मच्या बाजूला प्रवास करताना सेल्फी घेणे, रिल्स बनविणे किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करणे, एखाद्याचा जीव धोक्यात घालणे हे रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४५ आणि १४७ नुसार गुन्हा आहे.

३. रेल्वेच्या कलमांतर्गत अंतर्गत किमान १ हजार रुपये दंड आणि ६ महिने तुरुंगवासाची तरतूद आहे.

४. रेल्वे प्लॅटफॉर्मच्या काठावर पिवळी लाईन ओलांडली, तर ५०० रुपये दंड आकारला जाऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला महिनाभर तुरुंगवास भोगावा लागू शकतो. रेल्वे कायद्याच्या कलम १४७ नुसार रुळ ओलांडणे हा देखील गुन्हा आहे. (Reels in Train)

कशी घ्यावी शूटिंगची परवानगी ?

१. चित्रीकरणाच्या विषय, संवादाची संपूर्ण माहिती चित्रीकरणाच्या अगोदरच रेल्वेला कागदोपत्री सादर करावी लागते. त्यानंतर रेल्वे त्याची पडताळणी केल्यावर चित्रीकरनाची अनुमती दिली जाते.

२. पब्लिक रिलेशन मॅन्युअल पॉलिसी २००७ नुसार, चित्रीकरण करण्याची अनुमती दिली जाते. यासाठी रेल्वे चित्रीकरण करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तीकडून नियमानुसार रक्कम वसूल करते.

३. चित्रीकरण करतेवेळी सुरक्षासुद्धा प्रदान केली जाते.

४. विना परवानगी रेल्वे गाड्या किंवा रेल्वे परिसरात चित्रीकरण केल्यास आणि सोशल मीडियावर ते चित्रीकरण प्रदर्शित केल्यास ‘रेल्वे कायदा १९८९’च्या कलम १४५ आणि १४७ नुसार कारवाई केली जाते. या कारवाईत चित्रीकरण करण्यात आलेल्या साहित्य अर्थात कॅमेरा, मोबाईल जप्त करण्याची तरतूद आहे. (Reels in Train)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.