‘या’ जिल्ह्यात लसीकरण जनजागृतीसाठी अनोखी मोहीम!

95

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, सरकारच्या नियमावलीनुसार सोलापूर जिल्ह्यात लसीकरणावर भर दिला जात आहे. महापालिकांकडून लसीकरणासाठी जास्तीत जास्त जनजागृती केली जात आहे. आता लसीकरण जनजागृतीसाठी एलइडी स्क्रीन लावलेले वाहन शहरातील विविध भागात फिरणार आहे. या वाहनाची पाहणी सोलापूर महापालिका उपायुक्त धनराज पांडे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. अरुंधती हराळकर यांनी केली. लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी एलइडी स्क्रीन व्हॅनद्वारे जनजागृती मोहीम सुरू करण्यात येणार आहे. युनिसेफ व राज्य आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एलईडी व्हॅन सोलापूर महापालिकेस मिळाली आहे. पंधरा दिवस हे वाहन फिरणार आहे. प्रामुख्याने लसीकरण कमी झालेल्या भागात हे वाहन जाईल.

( हेही वाचा : स्वस्त मस्त BEST! ‘या’ सुपर सेव्हर योजना करणार प्रवाशांची बचत! )

शहरात घरोघरी ‘व्हायरल फ्लू’

बदलत्या हवामानामुळे सोलापूर जिल्ह्यातील कमाल व किमान तापमानात मोठा फरक पडत आहे. दुपारी ऊन तर रात्री कडाक्याची थंडी पडत आहे. शहरातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून त्याचबरोबर कमाल-किमान तापमानातील घट, ढगाळ हवामान अशा वातावरणामुळे शहरात घरोघरी ‘व्हायरल फ्लू’ने डोके वर काढले आहे. त्यामुळे सध्या खासगी  दवाखान्यांपासून ते शासकीय रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभागातही रुग्णांची गर्दी वाढत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.