Uttarpradesh : वधूने विवाहभेट म्हणून मागितला रस्ता; आमदाराने केली ‘ही’ घोषणा

156
Uttarpradesh : वधूने विवाहभेट म्हणून मागितला रस्ता; आमदाराने केली 'ही' घोषणा
Uttarpradesh : वधूने विवाहभेट म्हणून मागितला रस्ता; आमदाराने केली 'ही' घोषणा

उत्तरप्रदेश (Uttarpradesh) राज्यातील अलीगढमधील (Aligarh) घांघौली गावात एका नवविवाहित वधूने भाजपचे विधानपरिषदेचे आमदार ऋषिपाल सिंग (MLC Rishipal Singh) यांच्याकडे विवाहभेट म्हणून रस्ता मागितला. वधूच्या या मागणीवर आमदारांनी 500 मीटर लांबीचा रस्ता बांधण्यात येणार असल्याची घोषणा केली. वधूच्या या निराळ्या मागणीनंतर गावातील लोकांनी आनंद व्यक्त केला. तसेच विधानपरिषद सदस्याला गदा देऊन सन्मानित केले.

(हेही वाचा – Prakash Ambedkar :  प्रकाश आंबेडकरांची लोकसभेच्या १२ जागांची मागणी; आघाडीत बिघाडीची शक्यता… )

येथील युवक भरत पहलवान (Bharat Pahalwan) हा आय.टी.बी.पी.मध्ये कार्यरत आहे. 10 डिसेंबर रोजी वृंदावनमधील पानी गावातील रहिवासी असलेल्या राधाशी त्यांचा विवाह झाला. गावातील मुख्य रस्ता पाच वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत आहे. याबाबत अनेकदा प्रशासनाकडे तक्रार केली, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.

नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी विधानपरिषदेचे आमदार ऋषिपाल सिंग (MLC Rishipal Singh) त्यांच्या घरी पोहोचले. या वेळी वधूने भेट (wedding gift) म्हणून मुख्य रस्त्यावरून गावाकडे येणारा रस्ता बांधण्याची मागणी केली. यानंतर आमदारांनी रस्ता बांधण्याची घोषणा केली.

(हेही वाचा – Belapur Family Court : वाढत्या नागरिकरणामुळे कौटुंबिक वादांचे प्रमाण जास्त – न्यायमूर्ती भारती डांगरे)

“मी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी गेलो आणि त्यांनी रस्ता मागितला. मी तिथे पोचलो, तेव्हा रस्ता खचला होता. त्यामुळे गावकरी संतप्त झाले. मी रस्ता बांधण्याचे आश्वासन दिले आहे’, असे आमदार ऋषिपाल सिंग (MLC Rishipal Singh) म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.