Animal : मुसलमान खलनायक दाखवल्यावरच टीका होते; ‘अ‍ॅनिमल’चे निर्माते प्रणय रेड्डी वांगा यांचे प्रत्युत्तर

प्रणय रेड्डी वांगा (Pranay Reddy Wanga) यांनी म्हटले आहे की, आम्ही ३ पत्नी असलेला आणि ८ मुले असलेला खलनायक दाखवला. तो अल्पसंख्यांकांच्या धर्मातील असल्याने त्यावर टीका होत आहे.

322
Animal : मुसलमान खलनायक दाखवल्यावरच टीका होते; ‘अ‍ॅनिमल’चे निर्माते प्रणय रेड्डी वांगा यांचे प्रत्युत्तर
Animal : मुसलमान खलनायक दाखवल्यावरच टीका होते; ‘अ‍ॅनिमल’चे निर्माते प्रणय रेड्डी वांगा यांचे प्रत्युत्तर

हिंदी चित्रपट ‘अ‍ॅनिमल’वर (Animal) विविध कारणांवरून टीका होत आहे. या चित्रपटात प्रचंड रक्तपात, हिंसाचार आणि अश्‍लीलता दाखवण्यात आली आहे. अशातच टीका होत असतांना यातील खलनायक मुसलमान दाखवल्यावरूनही टीका होत आहे. या टीकेवर चित्रपटाचे सहनिर्माते, तसेच दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Wanga) यांचे बंधु प्रणय रेड्डी वांगा (Pranay Reddy Wanga) यांनी उत्तर दिले आहे.

(हेही वाचा – Violation Of IT Park : दादरमधील ‘त्या’ चारही इमारतींवरील कारवाई थंडावली)

म्हणून चित्रपटाला विरोध

प्रणय रेड्डी वांगा (Pranay Reddy Wanga) यांनी म्हटले आहे की, आम्ही ३ पत्नी असलेला आणि ८ मुले असलेला खलनायक दाखवला. तो अल्पसंख्यांकांच्या धर्मातील असल्याने लोकांनी त्यावर टीका करायला चालू केले आहे. गेल्या २० ते ३० वर्षांपासून चित्रपटात जेव्हा कपाळावर टिळा लावलेला हिंदु खलनायक दाखवला जात होता, तेव्हा कुणीच जाब विचारला नाही. मुसलमानांची अल्पसंख्यांक अशी ओळख आहे. केवळ म्हणूनच काही लोक या चित्रपटाचा विरोध करत आहेत. (Muslim Villain)

या चित्रपटात अभिनेते बॉबी देओल (Bobby Deol) यांनी मुसलमान खलनायकाची भूमिका वठवली आहे. त्यात त्याला ३ पत्नी आणि ८ मुले असल्याचे दाखवण्यात आले आहे. यावरून ही टीका होत होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.