Pakistan : पाकिस्तानातच झाला ईदच्या मिरवणुकीत स्फोट; ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

73
Pakistan : पाकिस्तानातच झाला ईदच्या मिरवणुकीत स्फोट; 'इतक्या' जणांचा मृत्यू
Pakistan : पाकिस्तानातच झाला ईदच्या मिरवणुकीत स्फोट; 'इतक्या' जणांचा मृत्यू

पाकिस्तानात ईद मिलादुन नबीनिमित्त मिरवणूक काढण्यात येत होती. तेव्हा मस्तुंग जिल्ह्यातील एका मशिदीजवळ मोठा स्फोट झाला. (Pakistan) विशेष म्हणजे आत्मघाती हल्लेखोराने ऑन-ड्युटी पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीजवळ बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात ५२ लोक ठार झाले असून ५० जण जखमी झाले आहेत.

(हेही वाचा – Ganeshotsav : गणेशोत्सव, मिरवणुका, गैरप्रकार आणि श्रद्धा…वाचा गणेशोत्सवाचे सध्याचे स्वरूप)

बॉम्बस्फोटानंतर रस्त्याच्या कडेला मृतदेह आणि कापलेले हातपाय आजूबाजूला पडलेले दिसत आहेत. परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. यानंतर देशाच्या प्रमुख शहरांमध्ये सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. कराची पोलिसांना ईद मिलाद-उन-नबी आणि शुक्रवारच्या नमाज संदर्भात शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी आणि अत्यंत सतर्क राहण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. (Pakistan)

त्यानंतर काही वेळातच दुसरा स्फोट खैबर पख्तूनख्वामधील हंगू येथे झाला. या स्फोटात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू आणि १२ जण जखमी झाल्याची बातमी आहे. (Pakistan)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.