Board Exam : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! आता होणार वर्षातून दोन वेळा बोर्डाची परीक्षा

222
Board Exam : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! आता होणार वर्षातून दोन वेळा बोर्डाची परीक्षा

शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना वर्षातून दोन वेळा (Board Exam) बोर्डाची परीक्षा द्यावी लागणार. नवीन शिक्षण धोरणानुसार केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अभयसक्रमाचा नवीन आराखडा जाहीर केली आहे. यानुसार आता विद्यार्थ्यांना दोनवेळा बोर्ड परीक्षा देता येणार तर, अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना एक ऐवजी दोन भाषा शिकणे अनिवार्य असणार आहे.

‘इस्रो’चे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बनविलेल्या नव्या शैक्षणिक (Board Exam) आराखड्यामध्ये म्हटले की, शाळा मंडळे योग्यवेळी मागणीनुसार परीक्षा घेण्याची क्षमता विकसित करतील.

आतापर्यंत दहावी आणि बारावीला वर्षाच्या शेवटी बोर्ड परीक्षा (Board Exam) देता येत होती. दहावीनंतर दोन आणि नंतर ३ वर्षे अशा शिक्षणाच्या पॅटर्नमध्ये आता बदल होणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत हा बदल होणार आहे. त्यानुसार यापुढं वर्षातून दोनवेळा बोर्डाची परीक्षा होणार आहे. यामुळे शिक्षणाचा आता १० प्लस २ हा पॅटर्नही रद्द होणार होईल. २०२४ पासून केंद्र सरकारचे हे नवे शैक्षणिक धोरण लागू होणार आहे.

(हेही वाचा – KEM Hospital : मधुमेहग्रस्तांसाठी खुशखबर! केईएम रुग्णालयात मिळणार मोफत इन्सुलिन)

आतापर्यंतचा शिक्षणाचा १० + २ पॅटर्न (Board Exam) सुरु होता. त्यामुळे विद्यार्थी दहावीनंतर दोन वर्षे अकरावी आणि बारावी करण्यात घालवत होती. पण आता हा पॅटर्न रद्द होणार असून यापुढे ५+३+३+४ या नव्या पॅटर्ननुसार शिक्षण (Board Exam) घेता येणार आहे.

न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार (Board Exam) केंद्र सरकारनं शिक्षण धोरणात हे महत्त्वाचे बदल केले आहेत. याची तात्काळ अंमलबजावणी केली जाणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजे २०२४ पासून राष्ट्रीय शिक्षा धोरण २०२० विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.

नव्या शैक्षणिक धोरणातील महत्वाचे मुद्दे
  • दीर्घकाळासाठी सर्व शिक्षण मंडळांनी सेमिस्टर किंवा नियतकालिक पद्धतीचा अवलंब करावा
  • एकूण प्रमाणीकरणात कामगिरीवर आधारित मूल्यांकनावर ७५ टक्के आणि लेखी परीक्षेवर २५ टक्के भर द्यावा.
  • विज्ञान आणि इतर विषयांचे मूल्यमापन कामगिरीवर आधारित म्हणजेच प्रयोगाशी जोडलेले असावे. विषयाच्या प्रमाणीकरणात त्याला २०-२५ टक्के महत्त्व असायला हवे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) नवीन अभ्यासक्रम आराखडा तयार आहे आणि त्यावर आधारित, २०२४ च्या शैक्षणिक सत्रासाठी पाठ्यपुस्तके तयार केली जात आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.