-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांमध्ये परिणामकारकता व पारदर्शकता सुनिश्चित केली जावी, या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने महानगरपालिका मुख्यालयात ‘वॉर रुम’ स्थापन केली आहे. या ‘वॉर रुम’ मधून प्रत्यक्ष कार्यस्थळी सुरू असलेल्या कामांवर संनियंत्रण व देखरेख ठेवण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी या ‘वॉर रुम’ला मंगळवारी २९ एप्रिल २०२५ रोजी भेट दिली. (BMC)
मुंबईतील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. ही कामे योग्यरित्या होण्यासह त्यावर संनियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका मुख्यालयात विस्तारित इमारतीत सहाव्या मजल्यावर ‘वॉर रुम’ सुरू करण्यात आली आहे. दररोज सकाळी ८ वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत दोन सत्रांमध्ये या ‘वॉर रुम’ मधून महानगरपालिका प्रशासनाचे गाळ काढण्याच्या कामकाजावर पारदर्शकता आणि संनियंत्रणाकामी लक्ष असणार आहे. त्यासाठी या ‘वॉर रुम’ मध्ये एका अभियंत्यासह तीन जणांचा चमू नेमण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिली. (BMC)
(हेही वाचा – Cabinet Decision : मंत्रिमंडळाचे निर्णय वाचा एका क्लिकवर…)
नागरिकांनाही उपलब्ध होणार माहिती
नाल्यांमधून जसजसा गाळ उपसा केला जात आहे, तसतसा त्याचा अद्ययावत अहवाल या डॅशबोर्डवर तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विशेष म्हणजे आपल्या परिसरातील नाल्यातून किती गाळ काढला, गाळ काढण्याच्या कामाची सद्यस्थिती याबाबत सर्वसामान्य मुंबईकरांनाही या डॅशबोर्डद्वारे माहिती मिळणार आहे. त्यासाठी महानगरपालिका संकेतस्थळावर ही लिंक (https://swd.mcgm.gov.in/WMS2025/#/predashboard) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गाळ काढण्यास सुरुवात करण्याआधी नाल्याची स्थिती आणि गाळ काढल्यानंतरची नाल्याची स्थिती अशी दोन्ही वेळची छायाचित्रे आणि चित्रीकरणही या वॉर रुमच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. (BMC)
(हेही वाचा – Pune: नकली नोटाचं रॅकेट उघड; २८ लाखांच्या खोट्या नोटा जप्त)
असा होणार कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर
संपूर्ण नाले स्वच्छतेच्या कालावधीत साधारणत: ७ हजार मिनिटांचे चलचित्र अपलोड केले जाणे अपेक्षित आहे. या सर्व चलचित्रांची पाहणी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे केली जाईल. या चलचित्रांमध्ये त्रुटी किंवा सर्वसामान्य गोष्टींपेक्षा काही वेगळे आढळले तर या प्रणालीकडून असे व्हिडिओ निवडून ते वेगळे काढण्यात येतील व त्याबाबत सतर्क केले जाईल. अशी चलचित्रे या प्रणालीने तपासल्यानंतर चमूकडून (manually) आणि प्रत्यक्ष (physically) तपासली जातील. (BMC)
वजन काट्यांवर जेव्हा वाहन येते तेव्हा त्या वाहनावरील ताडपत्री काढणे अपेक्षित आहे. जर वाहनावरील ताडपत्री काढलेली नसेल, तर प्रणाली स्वत:हून त्याबाबीची नोंद घेईल व अशा वाहनांच्या वजनाची पावती तयार होणार नाही. एखाद्या वाहनात सामान्यत: आढळून येणाऱ्या वजनापेक्षा जर अतिरिक्त वजन आढळले तर ते सुद्धा या प्रणालीमार्फत शोधून दिले जाणार आहे. त्यानंतर अशा वाहनांची पुढील तपासणी केली जावू शकते. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community