BMC : शुक्रवारी स्थायी समितीची बैठक, राहुल शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार सभा

2403
Maratha Kranti Morcha : महापालिकेचे तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान
Maratha Kranti Morcha : महापालिकेचे तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान
  •  सचिन धानजी, मुंबई 
महापलिका निवडणूक (municipal corporation) अद्याप झालेली नाही.  नगरसेवक महापालिकेत नाहीत. प्रशासक यांच्या हाती महापालिकेचा कारभार आहे. तरीही येत्या शुक्रवारी  मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक होणार आहे आणि या बैठकीला स्थायी समिती अध्यक्ष,  समिती सदस्य, महापालिका आयुक्त, सचिव  आदी सर्व उपस्थित राहणार आहेत. (BMC)
स्थायी समितीचे सलग चार वेळा अध्यक्ष पद  भूषविणारे  विद्यमान खासदार राहुल शेवाळे ही बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी विविध पक्षातील स्थायी समितीच्या समितीच्या सदस्यांना विशेष निमंत्रित केले जाणार आहेत. तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष हे राहुल शेवाळे होते, त्यामुळे ते या समितीचे अध्यक्ष पद भुषवतील. आणि तत्कालीन आयुक्त हे सुबोध कुमार हे होते. त्यामुळे तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. (BMC)
अर्थात ही अभिरूप स्थायी समितीची बैठक असेल आणि एप्रिल  २०१२ मध्ये असणाऱ्या विविध पक्षातील तत्कालीन जे नगरसेवक या समितीचे सदस्य होते, त्या सर्वांना निमंत्रित केले जाणार आहे. स्थायी समितीच्या तत्कालीन सदस्य, आयुक्त यांच्या सत्कार सोहळ्याचा हा कार्यक्रम असेल आणि स्थायी समिती सभागृह उपलब्ध नसल्याने महापालिका सभागृहात हा बैठक वजा कार्यक्रम होणार आहे.(BMC)
कोस्टल रोड ची मूळ संकल्पना २०११ मध्ये मांडली गेली असली तरी त्याचा अहवाल २०१२ मध्ये बनला गेला. तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे (Rahul shewaale) यांनी आपल्या भाषणात या कोस्टल रोड प्रकल्पाचा उल्लेख करत सूचना केली होती आणि तत्कालिन आयुक्त सुबोध कुमार यांनी या प्रकल्पाची माहिती त्यावेळी समितीला दिली. त्यावेळी खऱ्या अर्थाने या प्रकल्पाची मुहूर्त मेढ रोवली गेली होती. तेव्हा घोषणा झालेला हा प्रकल्प आता प्रत्यक्षात येवून त्यातील एक मार्गिका मंगळवार पासून  खुली झाली आहे. ही एक  मार्गिका खुली केल्यानंतर लोकांना अधिक दिलासा मिळायला लागला असून वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज  रेल्वे टर्मिनस  तथा महापालिका मुख्यालय प्रवास अवघ्या १५ मिनिटात पार पडला जातो. त्यामुळे अभिनंदन हा येत्या शुक्रवारी होणार आहे. याचे आयोजन विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनी केले आहे.शुक्रवारी दुपारी २ वाजता हा कार्यक्रम नियोजित आहे.(BMC)
या अभिनंदन सोहळ्याला तत्कालीन शिक्षण समिती अध्यक्ष विठ्ठल खरटमोल,  यशोधर फणसे, ज्ञानराज निकम, मनोज कोटक, धनंजय पिसाळ, संदीप देशपांडे, रईस शेख चेतन कदम, रमेश कोरगावकर, हारून खान,गीता  गवळी, आसिफ झकेरिया, जोस्ना दिघे, दिलीप पटेल, प्रवीण छेडा,महेश पारकर,अनघा म्हात्रे, किशोरी पेडणेकर, अनुराधा पेडणेकर, सुनील मोरे, , शितल म्हात्रे, शुभा राऊळ, दिलीप लांडे, तृष्णा विश्वासराव, प्रवीण शहा, सिराज  शेख आदींसह तत्कालीन आयुक्त सुबोधकुमार आदींना निमंत्रित केले जाणार आहेत. या सर्वांचा यावेळी सत्कार  करून त्यांना स्मृती चिन्ह देण्यात येणार आहे,अशी माहिती मिळत आहे. (BMC)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.