Pankaja Munde : पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर परळीत फटाके फोडून केला जल्लोष

वैद्यनाथ साखर कारखान्याचे संचालक राजेश गिते, नितीन समशेट्टी, अश्विन मोगरकर, अनिष अग्रवाल, गोविंद मुंडे श्रीराम डापकर, विशाल मुंडे, रामकिसन गीते, किसन काठोळे, माऊली फड , विजयकुमार खोसे आदींसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

136
Pankaja Munde : पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर परळीत फटाके फोडून केला जल्लोष

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल शहरात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. पंकजा यांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला.

(हेही वाचा – Election Bonds : निवडणूक रोख्यांच्या आकडेवारीचा तपशील ‘वेळेवर’ जाहीर केला जाईल – मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार)

कार्यकर्त्यांचा जल्लोष :

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी बुधवारी (१३ मार्च) जाहीर झाली, यात बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे नाव येताच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी एकत्र येवून पंकजाताई (Pankaja Munde) आगे बढो, खासदार डॉ.प्रितमताई आगे बढो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो..अशी जोरदार घोषणाबाजी करत फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

(हेही वाचा – Amit Shah : CAA मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही)

वैद्यनाथ साखर कारखान्याचे संचालक राजेश गिते, नितीन समशेट्टी, अश्विन मोगरकर, अनिष अग्रवाल, गोविंद मुंडे श्रीराम डापकर, विशाल मुंडे, रामकिसन गीते, किसन काठोळे, माऊली फड , विजयकुमार खोसे आदींसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. (Pankaja Munde)

महायुतीमध्ये जागावाटपाविषयी काही अंतिम ठरत नसल्यामुळे जागावाटपाची वाट न बघता भाजपाने (Pankaja Munde) महाराष्ट्रामधील (Maharashtra) उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधील जागावाटपाचा तिढादेखील लवकरच सुटण्याची शक्यता आहे.

कोणाला कुठून उमेदवारी ?

डॉ. हिना विजयकुमार गावित – नंदुरबार

डॉ. सुभाष रामराव भामरे – धुळे

स्मिता वाघ – जळगांव

रक्षा निखिल खडसे – रावेर

अनुप धोत्रे – अकोला

रामदास चंद्रभानजी तडस – वर्धा

नितीन जयराम गडकरी – नागपूर

सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर

प्रतापराव पाटील चिखलीकर – नांदेड

रावसाहेब दादाराव दानवे – जालना

डॉ. भारती प्रवीण पवार – दिंडोरी

कपिल मोरेश्वर पाटील – भिवंडी

पियुष गोयल – उत्तर मुंबई

मिहिर कोटेचा – उत्तर पूर्व मुंबई (इशान्य मुंबई)

मुरलीधर किशन मोहोळ – पुणे

डॉ. सुजय राधाकृष्ण विखे-पाटील – अहमदनगर

पंकजा मुंडे – बीड

सुधाकर तुकाराम शृंगारे – लातूर

रणजितसिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर – माढा

संजयकाका पाटील – सांगली

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.