BMC : नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्यासाठी आता सर्व अधिकाऱ्यांची होणार समन्वय संवाद बैठक

महिन्याच्या दर सोमवारी होणार बैठक

1675
BMC : नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्यासाठी आता सर्व अधिकाऱ्यांची होणार समन्वय संवाद बैठक

कोणत्याही विभागांमध्ये कामकाजात भेडसावणाऱ्या छोट्यामोठ्या समस्यांवर विसंवाद राहता कामा नये. योग्य समन्वय आणि सुसंवादाने बरेचसे मुद्दे सोडवले जाऊ शकतात. त्यामुळे, संपूर्ण प्रशासनाने उत्तम समन्वय आणि सुसंवाद ठेवता यावा यासाठी प्रत्येक महिन्याच्या एका सोमवारी सर्व अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त, संचालक, खातेप्रमुख यांची अशाप्रकारे समन्वय संवाद बैठक आयोजित केली जाणार आहे. ज्यामध्ये त्यांना येणाऱ्या समन्वयनात्मक अडचणींवर तसेच नवकल्पनांवर चर्चा केली जाणार आहे. (BMC)

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी २२ एप्रिल २०२४ रोजी समन्वय संवाद बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह विविध सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त, विविध खात्यांचे प्रमुख आदी यावेळी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या (BMC) नियमित कामकाजांसोबत वेगवेगळे प्रकल्प आणि अन्य कामांसाठी विभागांमध्ये समन्वय असावा, या हेतूने आयुक्त गगराणी यांनी या समन्वय संवाद बैठकीचे आयोजन केले होते. (BMC)

नागरी सेवा-सुविधांशी संबंधित प्रश्न हे प्रशासकीय कार्यवाहीप्रमाणेच समाजाशी, नागरिकांशी संबंधित असतात. जटील प्रश्नांची प्रशासकीय उत्तरे शोधता येतात. प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकसंवाद वाढवणे फार गरजेचे आहे. कारण, लोकसंवाद हे नागरिकांच्या प्रतिक्रियांची नोंद घेणे, त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे योग्य निराकरण करणे आदींसाठी महत्वपूर्ण आहे. कामकाजामध्ये सुकरता येण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेतील विभागांनी आपापसांत उत्तम समन्वय ठेवावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले. (BMC)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार Srirang Barne यांचा अर्ज दाखल)

गगराणींनी केले ‘हे’ आवाहन 

विविध विभागांशी संबंधित अधिकाऱ्यांकडून सूचना, नवकल्पना जाणून घेतल्यानंतर आयुक्त गगराणी यांनी सांगितले की, महानगरपालिका ही जगभरात नावलौकीकप्राप्त संस्था आहे. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आजवरच्या १५० वर्षांच्या कार्यकाळात तत्कालीन पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णय, राबविलेल्या अभिनव प्रकल्पांमुळे हे नावलौकिक आहे. संबंधित प्रकल्प उभारणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांचे नाव आजही स्मरण केले जाते. याच धर्तीवर विद्यमान अधिकाऱ्यांनी जनहित लक्षात घेऊन आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांच्या मदतीने किमान एकतरी असा अभिनव प्रकल्प सुरू करायला हवा. जो दीर्घकाळ टिकेल, दूरदृष्टीचा प्रकल्प म्हणून ओळखला जाईल. जेणेकरून निवृत्तीनंतर आपण अभिमानाने सांगू शकलो पाहिजे की, हा प्रकल्प आपल्या कार्यकाळात राबवला गेला. (BMC)

महानगरपालिकेचा एक-एक विभाग राज्यातील काही महानगरपालिकांच्या संपूर्ण कार्यक्षेत्रापेक्षाही मोठा आहे. येथील कोणत्याही विभागांमध्ये कामकाजात भेडसावणाऱ्या छोट्यामोठ्या समस्यांवर विसंवाद राहता कामा नये. योग्य समन्वय आणि सुसंवादाने बरेचसे मुद्दे सोडवले जाऊ शकतात. त्यामुळे, संपूर्ण प्रशासनाने उत्तम समन्वय आणि सुसंवाद ठेवावा, असे आवाहनही गगराणी यांनी केले. प्रशासनातील ज्या-ज्या विभाग/खात्यांकडे प्रलंबित, गुंतागुंतीचे वा अन्य कोणतेही प्रश्न असतील, तर ते वरिष्ठांसमोर आणावेत. प्रश्न, अडचणी तुंबून राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. असे प्रश्न, अडचणी यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यावर भर देण्यात येईल. त्यासोबत व्यापक जनहिताचे अभिनव प्रकल्प राबवावेत. नागरिकांसोबत संवाद वाढवून समस्या निकाली काढाव्यात, असे आयुक्त गगराणी यांनी नमूद केले. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.