उपायुक्त हसनाळे यांना लागली लॉटरी

132

मुंबई महापालिकेच्या उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे यांची बदली परिमंडळ एकच्या उपायुक्तपदी करण्यात आल्यानंतर अवघ्या पाच दिवसांमध्ये त्यांची पुन्हा त्यांच्या मूळ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु हसनाळे यांच्याकडे पुन्हा एकदा घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी सोपवताना परिमंडळ एकच्या उपायुक्त पदाचाही अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे हसनाळे यांची बदली परिमंडळ एकच्या उपायुक्तपदी केलेली असली तरी प्रत्यक्षात जुन्या पदाचा भार पुन्हा मिळवताना त्यांनी परिमंडळ एकचाही भार आपल्याकडे वळवून घेतला. त्यामुळे उपायुक्त हसनाळे यांना एकप्रकारे लॉटरीच लागल्याचे पहायला मिळत आहे.

( हेही वाचा : फायझर लसीमुळे ४० टक्के गर्भपात)

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी असलेल्या उपायुक्त डॉ.संगीता हसनाळे यांची १४ ऑक्टोबर रोजी परिमंडळ एकच्या उपायुक्तपदी केली. तर परिमंडळ एकच्या उपायुक्त चंदा जाधव यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी सोपवली होती. परंतु या बदलीच्या आदेशानंतरही हसनाळे आणि चंदा जाधव यांनी एकमेकांच्या जागा सोडल्या नव्हत्या. मात्र, या बदलीचे आदेश १८ ऑगस्ट रोजी पुन्हा बदलले गेले. त्यात हसनाळे यांची परिमंडळ एकवरून पुन्हा उपायुक्त पदी (घनकचरा व्यवस्थापन) बदली करण्यात आली आहे. तर परिमंडळ एकच्या उपायुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभारही जो चंदा जाधव यांच्याकडे होता, तो काढून हसनाळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

एकाबाजुला उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) आणि उपायुक्त परिमंडळ एक या दोन्ही पदांवरील अधिकाऱ्यांची अदलाबदली करताना पुन्हा हे बदली आदेश रद्द करताना दोघांकडील पदभार कायम ठेवणे अपेक्षित होते. परंतु महापालिका प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी चंदा जाधव यांना आधी परिमंडळ एक वरून उपायुक्त घनकचरा व्यवस्थपन पदी बदली केली. परंतु हसनाळे यांच्याकडे आता हा विभाग पुन्हा सोपवताना त्यांच्या बदलीच्या ठिकाणांचाही अतिरिक्त कार्यभार सोपवून एकप्रकारे चंदा जाधव यांना परिमंडळ एकच्या उपायुक्त पदापासूनही लांब केले आहे. त्यामुळे नक्की आयुक्त कुणाच्या सांगण्यानुसार काम करता असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.