Praja Foundation : मुंबईत वाढल्या कचऱ्यासह वायू प्रदुषणाच्या तक्रारी

मुंबई शहराला वायु प्रदूषण, उष्णतेच्या लाटा जाणि प्रदूषित पाण्याचे खोत अशा गंभीर समस्या जलद गतीने होणाऱ्या हवामान बदलामुळे व अकार्यक्षम स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन प्रकियेमुळे भेडसावत आहेत.

107

मुंबईमध्ये मागील काही वर्षांपूर्वी कचऱ्याच्या समस्यांमध्ये वाढ झालेली असताना कोविड काळात ही संख्या पुन्हा कमी झाली होती. परंतु कोविडनंतर पुन्हा एकदा कचऱ्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत असून मुंबईमध्ये घन कचरा व्यवस्थापनेसंबंधी नागरिकांच्या तक्रारी तब्बल १२४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. सन २०२२मध्ये कचऱ्यासंदर्भात १२ हजार ३५१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तर वायु प्रदूषणाच्यासंबंधी नागरिकांच्या तक्रारीतही २३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन २०२२ मध्ये तर वायू प्रदुषणाच्या २१९ तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे प्रजाच्या अहवालातून समोर आले आहे.

मुंबईतील नागरी समस्यांबाबत प्रजा फाऊंडेशनच्यावतीने अहवाल प्रसिध्द करण्यात आला असून यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, मलनि:सारण आणि हवा व पाण्याच्या गुणवत्तेबाबत लक्ष वेधण्यात आले आहे. “मुंबई महानगरपालिका डम्पिंग ग्राऊंडवर कचरा पाठविण्यासाठी या वाहतूक खर्च फलरा व्यवस्थापन प्रक्रियेच्या विकेंद्रीकरणाद्वारे कमी करू शकते. विशेषतः महापालिकेच्या सर्व २४ विभागातून प्रतिदिन १ मेट्रिक टन कचरा जमा करणे व क्षेपणभूमीवर पाठविण्यासाठीचा वाहतूक खर्च ३८४०  रुपये प्रति दिवस होतो. याप्रमाणे महानगरपालिका प्रति दिन ६३०० मेट्रिक टन कचरा वाहतूक करण्यासाठी २.४२ कोटी  रुपये प्रतिदिन याप्रमाणे वार्षिक खर्च ८८३ कोटी रुपये खर्च केला जात आहे. याशिवाय कांजुरमार्ग क्षेपणभूमीचा प्रति दिन प्रचलन व देखभाल खर्च  सुमारे ३००० रुपये प्रति मेट्रिक टन आहे, अशाप्रकारे प्रति दिन ५५०० मेट्रिक टन कचऱ्याचा वार्षिक खर्च ६०२ कोटी रुपये होतो. बृहन्मुंबई महानगरपालिकेने कचरा व्यवस्थापन विकेंद्रीकरण प्रक्रियेचा अवलंब करावयास हवा. जो स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियाना अंतर्गत एफ/दक्षिण विभागातील प्रभाग क्र. २०३ मध्ये यशस्वीरित्या केला गेला आहे. स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान या योजनेमध्ये सामाजिक संघटनांच्या सहभागाने झोपडपट्ट्यांमधून कचरा जमा करून त्यावर विभागामध्येच प्रक्रिया केली जाते, असे प्रजा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी नमुद केले आहे.

(हेही वाचा BMC : पूरपरिस्थितीचा सामना करण्याची महानगरपालिकेसह मुंबईतील सर्व यंत्रणांचे योगदान महत्वाचे)

मुंबई शहराला वायु प्रदूषण, उष्णतेच्या लाटा जाणि प्रदूषित पाण्याचे खोत अशा गंभीर समस्या जलद गतीने होणाऱ्या हवामान बदलामुळे व अकार्यक्षम स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन प्रकियेमुळे भेडसावत आहेत. सन २०१८ ते २०२२ वा मागील ५ वर्षांमध्ये अधिकतम सरासरी वार्षिक हवा गुणवत्ता निर्देशांक २०२२ (वार्षिक सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक १२५) मध्ये नोंदविण्यात आला. “सन २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये (एमसीएपी) घन कचरा व्यवस्थापनेची कार्यक्षमता सुधारणा, मलनिःसारण प्रक्रिया आणि हवेची उत्तम गुणवत्ता अशा ठोस उपाययोजनांचा समावेश केला आहे.

मुंबईमध्ये घनकचरा व्यवस्थापनेसंबंधी नागरिकांच्या तक्रारी १२४ टक्क्यांनी वाढल्या असून वायू प्रदुषणांच्या तक्रारी २३७ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर मल: निसारणासंबंधी नागरिकांच्या तक्रारी ३५ टक्यांनी वाढल्या आहेत, सन २०१३ मध्ये १२ हजार ७०८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, पण सन २०२२ मध्ये १७.१२१ तक्रारी प्राप्त झाल्या.

प्रजाच्या अहवालानुसार सन २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेने सरासरी प्रति दिन ६३८५ मेट्रिक टन सर्व २४ विभागातून जमा केला. त्यापैकी प्रति दिन अधिकतम कचरा ‘एल’ विभाग (प्रति दिन ४९१ मेट्रिक टन) जी/ उत्तर विभाग (प्रति दिन ४५९ मेट्रिक टन) आणि के पूर्व विभाग (प्रति दिन ४४१ मेट्रिक टन) या विभागांमधून कचरा जमा करण्यात आला.  परंतु ‘ए, ‘बी’ आणि ‘एच/ पश्चिम’ या विभागातून अनुक्रमे ०.९० कि.ग्रा. ०.८४ कि.ग्रा., व ० ७६ कि.ग्रा., अधिकतम दरडोई तथा प्रति दिन कचरा जमा करण्यात आला.

मिठी नदीमध्ये विष्ठेद्वारे (फिकल कोलिफॉर्म) होणारे प्रदूषण अतिशय जास्त आहे. मुंबईतील नद्यांचे व समुद्रकिनाऱ्यांचे पुनरुज्जीवन आणि जल प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजनांवर विशेष भर द्यावा, असे प्रजाचे  फांऊडेशनचे प्रमुख संशोधक योगेश मिश्रा यांनी स्पष्ट केले. एम.सी.ए.पी.जी प्रभावी अंमलबजावणी आणि ठोस देखरेखीद्वारे मुंबईतील हवामान बदलाच्या समस्येवर तोडगा काढता येईल ज्याद्वारे भावी पिढ्यांसाठी अधिक चांगले भविष्य निर्माण होईल, असे मिश्रा यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.