BMC : महापालिका शाळांमध्ये आणखी ९ संगीत अकादमी केंद्र

120

मुंबई महानगर पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कला गुणांची जोपासना होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, या उद्देशाने परिमंडळ निहाय संगीत अकादमी केंद्रे सुरु करण्यात आल्यानंतर आता विभाग निहाय संगीत अकादमी तयार करण्याचा निर्णय महापालिका शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार आता पश्चिम विभागातील ९ पैंकी ८ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरता संगीत अकादमी केंद्र बनवण्यात येणार आहे.

परिमंडळ तीन मधील एच पूर्व, एच पश्चिम आणि के पूर्व विभाग, परिमंडळ चारमधील पी उत्तर विभाग व के पश्चिम विभाग, परिमंडळ सात मधील आर मध्य, आर उत्तर आणि आर मध्य विभागातील महापालिका शाळांमध्ये संगीत अकादमी यातर करण्यात येणार आहे. पश्चिम विभागातील या विविध शाळांमध्ये संगीत अकादमी तयार करण्याची यादी शिक्षण विभागाने तयार केली असून त्यानुसार या महापालिका शाळांमध्ये संगीत अकादमी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या अकादमीची कामे करण्यासाठी सुमारे ६९ लाख रुपये खर्च केले जाणार असून यासाठी हर्षिल एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये ही केंद्र सुरु केली जाणार आहे.

(हेही वाचा Wari Jihad : वारी जिहाद : वारकऱ्यांच्या तोंडून वदवले ‘अल्ला खिलावे, अल्ला पिलावे’, पंढरीच्या वारीत धर्मांतराचा प्रयत्न?)

यापूर्वी महापालिकेच्या शिक्षण विभागाची एकमेव संगीत अकादमी होती, परंतु सन तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सन २०१८ १९ च्या महापालिका अर्थसंकल्पीय भाषणात सर्व ७ परिमंडळांमध्ये प्रत्येकी १ याप्रमाणे ७ संगीत अकादमी केंद्रे सुरु करण्याचे सुतोवाच केले होते. त्यानुसार त्याच शैक्षणिक वर्षांत महापालिकेच्या सर्व ७ परिमंडळांमध्ये प्रत्येकी १ याप्रमाणे ७ संगीत अकादमी केंद्रे नुकतीच सुरु करण्यात आली. ही केंद्रे भायखळा, परळ, सांताक्रूज, मालाड, चेंबूर, मुलुंड व कांदिवली आदी भागातील शाळांमध्ये उभारण्यात आली होती. त्यानंतर आता पश्चिम उपनगरांतील आठ विभागांमधील महापालिका शाळांमध्ये संगीत अकादमी केंद्र उभारण्याची कामे हाती घेण्यात आली आहे. या सर्व केंद्रांमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत पद्धतीनुसार गायन व वादन याचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच कथ्थक, भरतनाट्यम व मोहिनीअट्टम या तीन नृत्य शैलींचेही प्रशिक्षण या केंद्रांमध्ये दिले जात आहे. या प्रत्येक केंद्रात किमान २५ विद्यार्थ्यांना त्यांच्या कलानुसार संबंधित कलेतील प्रशिक्षण व मार्गदर्शन हे तज्ज्ञ गुरुंद्वारे दिले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.