Kashi Vishwanath Temple : अंतिम श्वासापर्यंत काशी विश्वेश्वराच्या मुक्तीसाठी लढू; याचिका मागे घेतल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका – अॅड. विष्णु शंकर जैन

138

उत्तरप्रदेश येथील काशी येथील ज्ञानवापी मशिदीत 16 मे 2022 मध्ये शिवलिंग मिळाल्यापासून आम्ही सातत्याने त्याच्या मुक्तीसाठी लढा देत आहोत. या लढ्यात मुसलमान पक्षकार यशस्वी होणार नाहीत हे ज्ञात असल्याने, ते या याचिकेच्या संदर्भात अडथळे निर्माण करण्याचे कार्य करत आहेत. तसेच काही जणांना हाताशी धरून याचिका मागे घेतल्याच्या अफवा पसरवत आहेत. प्रत्यक्षात कोणतीही याचिका आम्ही मागे घेतलेली नाही आणि मी सर्वांना खात्री देतो की, जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत श्री काशी विश्वेश्वराच्या मुक्तीसाठी आम्ही लढत राहू, असे विधान ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते आणि सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले.

काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या श्री श्रृंगारगौरी देवी, हनुमान, श्रीगणेश येथील देवतांची पूजा करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी आम्ही लढा देत आहोत. काशी विश्वेश्वराची मुक्ती होईल, तेव्हा देश अखंड हिंदु राष्ट्र होईल. काशी विश्वेश्वराच्या मुक्तीचे मोठे लक्ष्य घेऊन आपण मार्गक्रमण करत आहोत. यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन या संपूर्ण परिसराच्या सर्वेक्षणाची मागणी लावून धरायला हवी, असे आवाहन अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले. ते ‘श्रीरामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या दुसर्‍या दिवशी ‘मंदिर मुक्ती अभियान’ या सत्रात बोलत होते.
या प्रसंगी अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील श्री महालक्ष्मी मूर्तीच्या संदर्भातील सद्यस्थिती, तसेच कर्नाटक येथील सहकार संजीवनी रुग्णालयाचे डॉ. एन्. रमेश हासन यांनी चन्नकेवर मंदिरात कुराण वाचण्याच्या विरोधात दिलेल्या यशस्वी लढ्याची माहिती दिली, तर आंध्रप्रदेश येथील हिंदू उपाध्याय समितीचे संस्थापक अध्यक्ष महेश डेगला यांनीही मनोगत व्यक्त केले.

(हेही वाचा Wari Jihad : वारी जिहाद : वारकऱ्यांच्या तोंडून वदवले ‘अल्ला खिलावे, अल्ला पिलावे’, पंढरीच्या वारीत धर्मांतराचा प्रयत्न?)

गंगानदीमध्ये रोगमुक्त करण्याची क्षमता संशोधन आवश्यक  – अधिवक्ता अरुण गुप्ता

गंगा नदीमध्ये प्राणवायूची पातळी सर्वाधिक असून नदीत ‘बॅक्टेरिया फॉस’ नावाचा विषाणू असतो. त्यामुळे गंगाजल खराब होत नाही. कोरोनाकाळात गंगा नदीच्या किनार्‍यावरील शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण अन्य शहरांहून अल्प आढळले असून बरे होणार्‍यांची संख्याही अधिक आढळून आली आहे. केवळ कोरोनाच नाही, तर अन्य आजारही गंगेच्या पाण्याने बरे होऊ शकतात. त्यामुळे अशा गंगाजलावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे.
या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल द्वारेही केले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.