
BEST Strike Update: मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन समजली जाणारी बेस्ट सेवा काल (18 जून) मध्यरात्री १२ वाजेपासून ठप्प झाली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी बेस्ट कृती समितीकडून संपाची (BEST employees strike) हाक देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनीवर त्याचा परिणाम होणार असून या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. एकीकडे कोर्टाच्या बंदीनंतरही बेस्टचे २३ हजार कर्मचारी संपावर गेल्याने मुंबईकरांचे काहीसे हाल होतांनाचे चित्र आहे.
दरम्यान, आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कृती समितीने पुकारलेल्या संपामुळे बेस्ट सेवा पुरती विस्कळीत झाली आहे. एकीकडे शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्या संघटनांनी संप मागे घेण्याच आवाहन केलं असलं तरी मोठ्या संख्येने कर्मचारी संपात सहभागी झाले झाल्याने बेस्ट सेवा जवळजवळ ठप्प झाली आहे. तर याचा फटका मुंबईकरांना बसला आहे. बस थांब्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत असून संपाची पूर्व कल्पना नसलेल्या मुंबईकरांना ऐन सकाळी मनस्ताप सहन करावा लागतोय. या संपावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी मुंबईकरांनी केली आहे. (BEST Strike Update)
हेही वाचा – भारताच्या रणरागिणी अनुपमा सिंग कोण आहेत? ज्यांनी UN मध्ये Pakistan च्या खोट्या दाव्यांच्या उडवल्या चिंधड्या
संपामुळे बेस्ट सेवा पुरती विस्कळीत, बस थांब्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी
आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कृती समितीने पुकारलेल्या संपामुळे बेस्ट सेवा पुरती विस्कळीत झाली आहे, एकीकडे शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्या संघटनांनी संप मागे घेण्याच आवाहन केलं असल तरी मोठ्या संख्येने कर्मचारी संपात सहभागी झाले झाल्याने बेस्ट सेवा जवळजवळ ठप्प झाली आहे आणि याचा फटका मुंबईकरांना बसला आहे. बस थांब्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत असून संपाची पूर्व कल्पना नसलेल्या मुंबईकरांना ऐन सकाळी मनस्ताप सहन करावा लागतोय. या संपावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी मुंबईकरांनी केली आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप; प्रमुख मागण्या नेमक्या काय?
– बेस्ट सेवांचे कंत्राटीकरण थांबवा
– बेस्ट मालमत्तांचा पीपीपी तत्वावर पुनर्विकासाला विरोध
– बेस्टचा स्वतंत्र अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करा
– निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी एकरकमी द्या
-कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडवा
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
