BEST Strike : सलग तिसऱ्या दिवशी संप; ‘बेस्ट’च्या २० आगारांमधून बसेस बाहेरच पडल्या नाहीत

83

बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी पुकारलेल्या संपाच्या तिसऱ्या दिवशी तब्बल २० आगारांमधील कामगारांनी काम बंद आंदोलन केल्याने मुंबईतील बॅकबे, कुलाबा, मुंबई सेंट्रल, वरळी, प्रतिक्षा नगर, आणिक, धारावी, काळाकिल्ला, देवनार, शिवाजी नगर, घाटकोपर, मुलुंड, मजास, सांताक्रूझ, ओशिवरा, मालवणी, गोराई आणि मागाठणे या आगारांमधील बसेस न धावल्याने या भागातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. मात्र, संपकरी कंत्राटी कामगार आपल्या आंदोलनावर ठज्ञम असल्याने याबाबत कंत्राटदाराने चर्चा करून यावर तोडगा न काढल्यास शनिवारीही हे आंदोलन कायम राहिल असे कामगारांचे म्हणणे आहे.

रोजी बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये एकूण स्वतःच्या मालकीच्या १३९० आणि वेट लिजवरील १६७१ अशाप्रकारे एकूण ३०६१ बस गाड्या आहेत. शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी खाजगी बस पुरवठा कंत्राटदाराच्या कामगारांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे १३७५ बस गाड्या रस्त्यावर आल्या नाहीत, एकूण ३६० वेट लिजवरील बस गाड्या उपक्रमाच्या बस चालकांद्वारे चालवून प्रवाशांना सेवा देण्यात आली होती.

(हेही वाचा Independence Day : येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान पुन्हा घरोघरी तिरंगा फडकणार!)

या संपात एसएमटी, मातेश्वरी, टाटा, हंसा, ओलेक्ट्रा, आणि स्वीच या व्यवसाय संस्थेच्या कामगारांचा समावेश होता. असे असले तरी एसएमटी, मातेश्वरी, हंसा या बस पुरवठादार संस्थेच्या अनुक्रमे ७६, ३५ आणि १६२ बस गाड्या रस्त्यावर धावत होत्या, असेही बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले. या सर्व बस पुरवठादार कंपनीविरोधात अटी व शर्ती प्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच त्यांना त्वरित त्यांच्या कामगारांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही बेस्ट उपक्रमाने म्हटले आहे.

बेस्ट उपक्रम आपल्या जास्तीत जास्त बस चालकांचा वापर करून जास्तीत जास्त बस गाडया रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला जात असून जेणे करून प्रवाशांना बस सेवा उपलब्ध होईल.या काम बंद आंदोलनामुळे बॅकबे, कुलाबा, मुंबई सेंट्रल, वरळी, प्रतिक्षा नगर, आणिक, धारावी, काळाकिल्ला, देवनार, शिवाजी नगर, घाटकोपर, मुलुंड, मजास, सांताक्रूझ, ओशिवरा, मालवणी, गोराई आणि मागाठणे अशा एकूण २० आगारांच्या बस गाड्यांच्या फेऱ्यांवर फरक पडला. संध्याकाळी सव्वा सात वाजेपर्यंत बेस्ट उपक्रमाने महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी महामंडळाच्या ७४ बस गाड्यांची सेवा प्रवाशांना उपलब्ध करून दिली दिल्या असून दिवसभरात एसटी महामंडळाच्या सुमारे १५० बस गाड्यांची सेवेत दाखल होतील असे बेस्टने नमुद केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.