बेस्ट खाजगीकरणाच्या वाटेवर अन् प्रवाशांची होतेय गैरसोय!

112

बेस्ट उपक्रमाच्या जोगेश्वरी बस स्थानक येथून श्री स्वामी समर्थ नगर येथे जाण्याकरिता शनिवार दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजून ३३ मिनिटांनी बरेच प्रवासी, बसमार्ग क्रमांक २३१ या बसगाडीच्या प्रतीक्षेत रांगेत उभे होते. बऱ्याचदा या बसमार्गावर बेस्ट तर्फे कंत्राटदाराच्या (टेम्पो ट्रॅव्हलर) वातानुकूलित मिडी बसगाड्या चालवल्या जातात. सुमारे १२ वाजून ४० मिनिटांनी बेस्ट उपक्रमातर्फे या मार्गावर वातानुकूलित बसगाडी न पाठवता गोरेगांव आगाराची नियमित मोठ्या आकाराची साधी बसगाडी लावण्यात आली. खरं तर बेस्टच्या सुधारित भाडे नियमाप्रमाणे उपरोक्त मार्गावर जाण्याकरिता साध्या बसगाडीचे भाडे हे ५ रुपये इतके निश्चित केलेले आहे. परंतु सदर वेळेस कर्तव्यावर ग्राउंड बुकिंग करीत उपस्थित असलेले बसवाहकांनी प्रवाशांना साध्या बसगाडीचे तिकीट देण्याऐवजी वातानुकूलित बसगाडीचे ६ रुपयांचे ए २३१ बसमार्गाचे छापील तिकीट फाडून दिले, असा दावा आपली बेस्ट आपल्याचसाठी या संघटनेने केला आहे.

( हेही वाचा : देशात कुठेही मिळणार उपचार, आधारप्रमाणे झटपट काढा ‘हेल्थ कार्ड’! सरकारच्या ‘आभा’ उपक्रमाविषयी जाणून घ्या…)

सदर गोष्टीबाबत प्रवाशांनी प्रश्न उपस्थित केला गेला असता, “लोकाग्रहास्तव आम्ही साधी बसगाडी या मार्गावर पाठवली!” असे सदर बसवाहक आणि बस स्थानकात हजर असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी सांगितले. अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध असताना बसगाड्या विनावाहक सोडून आपण प्रवाशांना वेठीस धरणं कितपत योग्य आहे? असा सवाल आपली बेस्ट आपल्याचसाठी या संघटनेने केला आहे. तसेच या संघटनेने चलोच्या विविध योजनांवर सुद्धा निशाणा साधला आहे. मुंबईकर प्रवाशांनो ‘योजनाबद्ध खाजगीकरणाचा’ कायम विरोध करा. तुम्हीही या खाजगीकरणाविरुद्ध एकत्र या असे आवाहन आपली बेस्ट आपल्याचसाठी या संघटनेने प्रवाशांना केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.