पुन्हा पंतप्रधान स्वनिधीचा लाभ : फेरीवाले म्हणतात, कारवाई आधी थांबवा

192
पुन्हा पंतप्रधान स्वनिधीचा लाभ : फेरीवाले म्हणतात, कारवाई आधी थांबवा
पुन्हा पंतप्रधान स्वनिधीचा लाभ : फेरीवाले म्हणतात, कारवाई आधी थांबवा

मुंबईत आतापर्यंत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत साधारणपणे ९० हजार पथविक्रेत्यांना बँकेमार्फत अर्थसहाय्य वाटप करण्यात आले आहे. ही योजना डिसेंबर २०२४ पर्यंत लागू असून, अद्यापपर्यंत ज्या पथविक्रेत्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेतला नसेल त्यांनी तात्काळ संबंधित विभाग कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. मात्र, आम्हाला कर्ज नको, जागेवर व्यावसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी फेरीवाल्यांकडून केली जात आहे. त्यामुळे कर्ज नको, कारवाई थांबवा अशी म्हणण्याची वेळ फेरीवाल्यांवर आली आहे.

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या प्राप्त मार्गदर्शक सूचना व महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्याकरिता https://pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अद्याप ज्या पथविक्रेत्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेतलेला नसल्यास त्यांनी ते व्यवसाय करीत असलेल्या सबंधित विभाग कार्यालयात वरिष्ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मूलन) यांच्याशी संपर्क साधून, संकेतस्थळावर अर्ज करावा. तसेच अर्ज भरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन विभाग कार्यालयातून करण्यात येईल.

कोविड संसर्गामुळे संपूर्ण देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला होता. तेव्हापासून त्यांच्या व्यवसायास खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडून ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ राबविण्यात येत आहे. मुंबईत आतापर्यंत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत साधारणपणे ९० हजार पथविक्रेत्यांना बँकेमार्फत अर्थसहाय्य वाटप करण्यात आले आहे. ही योजना डिसेंबर २०२४ पर्यंत लागू असून, अद्यापपर्यंत ज्या पथविक्रेत्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेतला नसेल त्यांनी तात्काळ संबंधित विभाग कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

अशी आहे योजना

नागरी पथविक्रेते एक वर्षाच्या परतफेड मुदतीसह दहा हजार रुपयांपर्यंतचे खेळते भांडवल कर्ज घेण्यास आणि त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील. तसेच या दहा हजार रुपयांची परतफेड केल्यास सदर पथविक्रेत्यास आणखी २० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येईल. संबंधित कर्जदार पथविक्रेत्याने या २० हजार रुपयांची परतफेड केल्यास त्यास आणखी ५० हजार रुपयांचा लाभ देण्यात येईल.

(हेही वाचा – Suraj Chavan : चौकशीदरम्यान चव्हाण यांनी दिलेल्या माहितीबाबत ईडीचे अधिकारी असमाधानी)

असा करा अर्ज

संबंधित इच्छुक पथविक्रेत्याने https://pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. तसेच त्याच्याकडे आधार कार्डशी जोडणी असलेला भ्रमणध्वनी क्रमांक असणे आवश्यक आहे. पथविक्रेत्याने स्वत: व्यवसाय करणे आवश्यक आहे. तसेच या योजनेचा लाभ घेतल्यास “स्वनिधी से समृद्धीतक” या प्रधानमंत्री यांच्या योजनेचा लाभ संपूर्ण कुटूंबास प्राप्त होणार आहे.

मात्र, मागील काही दिवसांपासून फेरीवाल्यांवर कारवाई सुरु असून एका बाजुला पंतप्रधान स्वनिधीतून कर्ज दिले जात असले तरी याचा लाभ दिल्यानंतरही त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी दिली जात नाही. उलट सर्व फेरीवाल्यांवर कारवाई केली जात असल्याने फेरीवाले संतप्त झाले आहेत. जर कारवाईच करायची आहे तर आम्हाला कर्ज का दिले? जर बसायला देणार नाही, तर आम्ही व्यावसाय कसे करणार आणि कर्जाचे हप्ते कसे भरणार असा सवालही फेरीवाल्यांकडून केला जात आहे. त्यामुळे फेरीवाल्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जर कारवाईच होणार असेल तर आम्हाला तुमचे कर्ज नको अशी प्रतिक्रिया फेरीवाल्यांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.