Bank Strike : देशभरातील बॅंक कर्मचारी विविध मागण्यांसाठी ‘या’ तारखेला संपावर

91

बॅंक कर्मचाऱ्यांनी १९ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. देशभरातील ३ लाख कर्मचारी एक दिवासाच्या संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनच्या नेतृत्वाखाली या संपाची हाक देण्यात आली आहे.

( हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वप्नभंग : मुंबईतील ५८०० कोटींच्या रस्ते कामांच्या निविदा रद्द)

बॅंक कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर

बॅंक व्यवस्थापन कर्मचारी संघटनांसोबत चर्चा करून निर्णय न घेत नाही एकतर्फी निर्णय घेतले जातात असे कर्मचारी संघटनांनी म्हटले आहे. या व्यवस्थापनाच्या धोरणांच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, कॅनडा बॅंक, फेडरल बॅंक, सेंट्रल बॅंक, कॅथॉलिक सीरीयन बॅंक आदी बॅंकांमधील औद्योगिक संबंध सध्या अनेक बॅंकनिहाय प्रश्नांवरून तणावपूर्ण झाले आहेत हे लक्षात घेता एआयबीईएने या संपाची हाक दिली आहे.

बॅंक कर्मचारी संघटनांनी नोटबंदी, जीएसटी, जीवन ज्योती, जीवन सुरक्षा, अटल पेन्शन, मुद्रा, स्वनीधी यांसारख्या सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत सरकारला मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले आहे. कोविड काळात सुद्धा कर्मचाऱ्यांनी अविरत सेवा दिली आहे. त्यामुळे बॅंकांचे खासगीकरण हे जनतेच्या हिताचे नाही. खासगीकरणामुळे जनतेच्या ठेवी असुरक्षित होतील अशी भीतीही कर्मचारी संघटनांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर बॅंक कर्मचाऱ्यांनी १९ नोव्हेंबरला संप पुकारला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.