Bank Holiday: महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा; जून महिन्यात ‘या’ दिवशी बँका बंद राहणार?

दर आठवड्याच्या रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असते.

270
Bank Holiday: महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा; जून महिन्यात 'या' दिवशी बँका बंद राहणार?
Bank Holiday: महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा; जून महिन्यात 'या' दिवशी बँका बंद राहणार?

बँकेशी संबंधित महत्त्वाची कोणतीही कामे , पुढच्या आठवड्यात लगेच पूर्ण करा, कारण आता मे महिना संपतू आला असून, लवकरच जून महिना सुरू होईल. या महिन्यात अनेक बँकांना सुट्ट्या असणार आहेत. (Bank Holiday)

दर आठवड्याच्या रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असते. पुढच्या महिन्यात म्हणजे जूनमध्ये बँकांना एकूण ८ दिवस असेल. १७ जूनला बकरी ईदनिमित्त देशभरातील बँका बंद असतील. १८ जूनला जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँकांचे कामकाज होणार नाही. (Bank Holiday)

(हेही वाचा – Gadchiroli Accident: धनूर येथे २७ प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस उलटली, नेमकं कारण काय ?)

ऑनलाईन सुविधा सुरू राहणार…
बँकेला सुट्टी असून ऑनलाईन बँकिंग आणि एटीएमद्वारे पैशांचे व्यवहार करू शकता किंवा इतर कामे करू शकता. बँकांच्या सुट्ट्यांचा या सुविधांवर कोणताही परिणाम होणार नाही. बँक बंद असताना, मोबाईल किंवा नेट बँकिंगद्वारे बँकेशी संबंधित अनेक कामे करू शकता. बँक बंद असताना ऑनलाईन सुविधा सुरू राहणार आहेत. (Bank Holiday)

‘या’ दिवशी बँका बंद राहतील…
– २ जून रोजी रविवार असल्याने बँक बंद राहतील.
– ८ जून रोजी दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद आहेत.
-९ जून रोजी रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत.
– १६ जून रोजी बँकांना रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल.
– १७ जूनला बकरी ईदनिमित्त बँक बंद राहणार आहेत.
– २२ जूनला चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल
– रविवार असल्यामुळे २३ जून रोजी बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
– रविवार असल्यामुळे ३० जून रोजी बँका बंद राहणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.