Pune Porsche Car Accident: अग्रवाल बाप-बेट्याच्या तावडीतून ‘असा’ सुटला ड्रायव्हर!

241
Pune Porsche Car Accident: अग्रवाल बाप-बेट्याच्या तावडीतून 'असा' सुटला ड्रायव्हर!
Pune Porsche Car Accident: अग्रवाल बाप-बेट्याच्या तावडीतून 'असा' सुटला ड्रायव्हर!

पुणे अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान, आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी शनिवारी (२५ मे) पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पोलीस आयुक्तांनी आपल्या पत्रकार परिषदेत अग्रवाल कुटुंबीयांनी त्यांच्या चालकाला कसे धमकावले, याबाबतचा सविस्तर तपशील सांगितला. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी अग्रवाल कुटुंबाकडून शक्य त्या सर्व मार्गांचा अवलंब केला जात आहे. अग्रवाल कुटुंबातील विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल (Surendra Agrawal) यांनी याप्रकरणात चालकावर खोटी जबानी देण्यासाठी दबाव आणल्याची माहिती समोर आली आहे. गंगाराम पुजारी (Gangaram Pujari) असे या चालकाचे नाव असून त्याने पोलिसांना सगळा प्रकार सांगितला आहे. (Pune Porsche Car Accident)

अग्रवाल बाप-बेट्यांनी चालकाला धमकावले

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “चालक आपल्या घरी जात असताना सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी त्याला आपल्या गाडीत बसवून घरी नेले. त्यानंतर आरोपींनी गंगाराम पुजारी याच्याकडून त्याचा मोबाईल काढून घेतला आणि त्याला घरातील एका खोलीत डांबून ठेवले. तू कुठेही जायचे नाही, कोणाशीही बोलायचे नाही. आम्ही सांगतो तोच जबाब पोलिसांना द्यायचा, असा दबाव अग्रवाल बाप-बेट्यांनी चालकावर आणला. तू हा गुन्हा तुझ्या अंगावर घे आम्ही तुला गिफ्ट देऊ, असे सांगून अग्रवाल यांनी गंगाराम पुजारीला आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. हे सांगूनही तो ऐकायला तयार नव्हता तेव्हा अग्रवाल बाप-बेट्यांनी चालकाला धमकावले. आम्ही तुला बघून घेऊ, अशी धमकी दिली.” अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली. (Pune Porsche Car Accident)

पत्नीचा आरडाओरड्यामुळे अग्रवालांच्या तावडीतून सुटला

“विशाल अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी चालक गंगारामला आपल्या घरात डांबून ठेवले होते. त्याचा मोबाईल फोन काढून घेतल्यामुळे घरच्यांशी संपर्क होऊ शकला नव्हता. आपला नवरा घरी आला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी गंगाराम पुजारीची बायको नातेवाईकांना घेऊन अग्रवाल कुटुंबीयांच्या घरी पोहोचली. अग्रवाल कुटुंबीयांनी गंगारामला सोडण्यास नकार दिला तेव्हा त्याच्या पत्नीने आरडाओरडा केला. त्यामुळे अग्रवाल कुटुंबाने गंगारामला सोडले. अग्रवाल यांच्या घरातून पत्नीसह बाहेर पडल्यानंतर गंगाराम घाबरला होता. पण पोलिसांनी परवा त्याचा जबाब नोंदवून घेतला. काल त्याची प्राथमिक चौकशी करुन आम्ही सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्यावर कलम 342, कलम 365 आणि कलम 368 अंतर्गत अपहरण, दमदाटी आणि डांबून ठेवण्याचा गु्न्हा दाखल केला. यानंतर सुरेंद्र अग्रवालला अटक केली असून त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले जाईल. विशाल अग्रवाल न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्याला आवश्यक ती प्रक्रिया करुन ताब्यात घेतले जाईल.” अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली. (Pune Porsche Car Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.