Gadchiroli Accident: धनूर येथे २७ प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस उलटली, नेमकं कारण काय ?

120
Punjab Accident: पंजाबमधून काश्मीरमध्ये स्कॉर्पिओ गाडीतून फिरायला आलेल्या ४ पर्यटकांचा मृत्यू, ३ गंभीर जखमी

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथून अमरावतीला निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा धनुरजवळ अपघात झाला. या अपघातात वाहकासह २ महिला प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस रस्त्याच्या कडेला उलटली होती, यामागचे कारण उघडकीस आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहेरी आगाराची बस जवळपास २७ प्रवाशांना घेऊन सकाळी ८.३०च्या सुमारास अमरावतीला जाण्यासाठी निघाली होती. अहेरीवरून जवळपास ३५ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील धनुरजवळ असलेल्या वनविभागाच्या नाक्याजवळ समोरून वाहन येत होते. त्या वाहनाला जाण्यासाठी वाट देत असताना ही बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल भागात उलटली.

(हेही वाचा – BMC पश्चिम उपनगरातील काही भागात या दिवशी  राहणार  पाणीपुरवठा  बंद; तर काही भागात कमी दाबाने पुरवठा )

अचानक बस उलटल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही जणांनी भीतीने आरडाओरडा केला. या अपघातानंतर रुग्णवाहिकेला बोलावण्यात आले. त्यानंतर जखमींना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.