उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई पहायला गेलेत का?; Ashish Shelar यांचा खोचक सवाल

132
उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई पहायला गेलेत का?; Ashish Shelar यांचा खोचक सवाल

पश्चिम उपनगरातील नालेसफाईची शनिवारी (२५ मे) तिसऱ्या दिवशी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी पाहणी केली. पश्चिम उपनगरातील नालेसफाई अद्याप समाधानकारक झाली नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. उद्धव ठाकरे कुठे आहेत ? लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का ? असा सवाल अ‍ॅड. शेलार यांनी केला. (Ashish Shelar)

मुंबईतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीने दुसऱ्या दिवसापासून मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे. प्रथम त्यांनी गजधरबांध परिसरातील नाल्याची पाहणी केली. तर शुक्रवारी पश्चिम उपनगरातील अंधेरी, वर्सोवा या नाल्यांची पाहणी केल्यानंतर शनिवारी त्यांनी वळणई नाला लिंक रोड मालाड (पश्चिम), अवधूत नगर नाला दहिसर (पूर्व) एन.एल कॉम्प्लेक्स जवळील नाला व दहिसर नदीची पाहणी केली. (Ashish Shelar)

(हेही वाचा – Maharashtra SSC Result 2024: ‘या’ दिवशी जाहीर होणार दहावीचा निकाल, निकाल कोणत्या वेबसाईटरवर पाहणार?)

यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार अ‍ॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, आम्ही नालेसफाईच्या कामाची पाहणी करतोय. जी आकडेवारी पालिका सांगतेय आणि प्रत्यक्ष चित्र यामध्ये तफावत आहे. वडनई नाल्याचा ९५ टक्के सफाईचा दावा केला जातोय, पण प्रत्यक्षात अद्याप गाळ नाल्यातून काढण्यात येतो आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका मांडली त्याचे स्वागत करीत आमदार अ‍ॅड. आशिष शेलार म्हणाले की, शिंदे हे जबाबदार मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी मुंबईकरांची काळजी केली. यापुर्वी उद्धव ठाकरेंच्या रूपाने बेजबाबदार मुख्यमंत्री मुंबईकरांनी पाहिला. ते घरी बसून नालेसफाईच्या कामाची पाहणी करीत होते. (Ashish Shelar)

मर्दांचा पक्ष म्हणून वारंवार सांगणारे उद्धव ठाकरे कुठे आहेत ? इथे नाल्यावर मर्दूमकी का दाखवत नाहीत, ते लंडनच्या नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले आहेत का ? असा खोचक सवालही आमदार अ‍ॅड. आशिष शेलारांनी (Ashish Shelar) केला. यावेळी त्यांच्या सोबत भाजपाचे स्थानिक आमदार, नगरसेवक, उत्तर मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, भाजपा पदाधिकारी आणि पालिका अधिकारी सहभागी झाले होते. (Ashish Shelar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.