Maharashtra SSC Result 2024: ‘या’ दिवशी जाहीर होणार दहावीचा निकाल, निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार?

509
Maharashtra SSC Result 2024: 'या' दिवशी जाहीर होणार दहावीचा निकाल, निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार?
Maharashtra SSC Result 2024: 'या' दिवशी जाहीर होणार दहावीचा निकाल, निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून (Maharashtra SSC Result 2024) फेब्रुवारी, मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकालाबाबत माहिती समोर येत आहे. बोर्डाने बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर केल्यानंतर राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि पालक दहावीच्या निकालाची वाट पाहत होते. आता अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. (Maharashtra SSC Result 2024)

(हेही वाचा –मतदान केल्यानंतर परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांना का मिळाले विशेष प्रमाणपत्र ?)

दहावीची परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि लातूर विभागांमार्फत परीक्षांचं आयोजन केलं जातं. या विभागीय मंडळांकडून उत्तर पत्रिका तपासणे आणि निकाल तयार करण्याचं काम पूर्ण झालं आहे. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निकाल कधी जाहीर करणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं. (Maharashtra SSC Result 2024)

निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार?

दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल mahresult.nic या वेबसाईटवर उपलब्ध होईल. याशिवाय आणखी काही वेबसाईटवर निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. डिजीलॉकरद्वारे देखील निकाल पाहता येऊ शकतो. तुम्ही या वेबसाईटना भेट देऊ शकता. काही अडचण आल्यास डिजीलॉकरचा भविष्यात फायदा होऊ शकतो. (Maharashtra SSC Result 2024)

(हेही वाचा –Nagpur Accident: नागपुरातही ड्रंक अँड ड्राईव्ह! आई- वडिलांसह ३ महिन्याच्या चिमुकल्याला उडवलं)

निकाल जाहीर झाल्यानंतर, एसएससी बोर्डाच्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी एसएमएसद्वारे देखील निकाल पाहू शकतात. त्यासाठी फोनच्या मेसेज ॲपवर जा आणि MHSSC टाईप करा नंतर स्पेस द्या आणि रोल नंबर टाइप करा आणि 57766 या क्रमांकावर पाठवा. तुमच्या मोबाईलमध्ये तुमचा निकाल येईल. (Maharashtra SSC Result 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.