Balasore Train Accident : ओडिसा रेल्वे अपघातातील मृतदेह ठेवलेल्या शाळेत जायला विद्यार्थी, शिक्षक घाबरले; अखेर शाळेची इमारत पाडली

शाळेत ज्या खोल्यांमध्ये मृतदेह ठेवण्यात आले होते, त्या खोल्यांची पूर्ण स्वच्छता करण्यात आली होती, मात्र असे असूनही मुलांचे पालक त्यांना शाळेत पाठवण्यास तयार नव्हते.

108

ओडिशा येथील बालासोर येथे तिहेरी रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला, तर ११०० जण जखमी आहेत. या अपघातातील मृतदेह बोलासोर येथील शाळेच्या इमारतीमध्ये ठेवण्यात आले होते, ज्या इमारतीमध्ये हे मृतदेह ठेवले त्यामध्ये जाण्यास विद्यार्थी आणि शिक्षक घाबरत असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे ही इमारत पाडली आहे.

बहनगा नोडल हायस्कूलचे तात्पुरते शवागार करण्यात आल्याने मुले व शिक्षकांनी गोंधळ घातला. त्यांनी शाळेत प्रवेश नाकारला. त्यांच्या या निर्णयामुळे शाळा पाडून नवीन इमारत बांधण्याचा विचार करण्यात आला. त्या दिशेने पाऊल टाकत शुक्रवारी ही शाळा पाडण्यात आली. शाळेच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य राजग्राम महापात्रा यांनी सांगितले की, ज्या खोल्यांमध्ये मृतदेह ठेवण्यात आले होते, त्या खोल्यांची पूर्ण स्वच्छता करण्यात आली होती, मात्र असे असूनही मुलांचे पालक त्यांना शाळेत पाठवण्यास तयार नव्हते. अशा स्थितीत आता शाळा पाडली जात आहे. नवीन इमारत तयार झाल्यानंतर मुले न घाबरता शाळेत यावेत यासाठी पुजारी बोलावून ती जागा पवित्र करण्यात येणार आहे. ही शाळा रेल्वे अपघाताच्या ठिकाणापासून फक्त ५०० मीटर अंतरावर आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळा बंद होती. २ जून रोजी झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर बचाव कार्यादरम्यान रेल्वेतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी काही जागा आवश्यक होत्या. अशा परिस्थितीत बहनगा नोडल हायस्कूलचा यासाठी वापर करण्यात आला. सुटी संपल्यानंतर १६ जूनपासून शाळा पुन्हा सुरू होणार होती, मात्र मुले व शिक्षकांनी शाळेत येण्यास नकार दिला.

(हेही वाचा Mukesh Khanna : नसीरुद्दीन शाह यांना मुकेश खन्नांनी सुनावले; म्हणाले, ‘लव्ह जिहाद’च्या टीममध्ये सामील व्हा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.