Mukesh Khanna : नसीरुद्दीन शाह यांना मुकेश खन्नांनी सुनावले; म्हणाले, ‘लव्ह जिहाद’च्या टीममध्ये सामील व्हा

नसीरुद्दीन शाह यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना त्यांनी हिंदू विरोधी वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे.

96

कसदार अभिनयाबरोबरच राजकीय व सामाजिक विषयांवर बेधडक मत मांडणारे अभिनेते नसीरुद्दीन शाह कायम यामुळे वादात सापडत असतात. सध्या शाह हे अशाच एका वक्तव्याने पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. त्यावर ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी शाह यांना चांगलेच सुनावले. तुम्ही कट्टर बनत चालले आहात आणि एक अभिनेता म्हणून ते योग्य नाही. असेच आहे तर लव्ह जिहादच्या टीममध्ये सामील व्हा, असे खन्ना यांनी म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)

काय म्हणाले नसीरुद्दीन शाह?

एका वृत्तवाहिनीशी बोलताना नसीरुद्दीन शाह म्हणाले होते की, काही चित्रपट आणि शो यांचा प्रचारासाठी वापर केला जात आहे. यासोबतच चित्रपट आणि शो यांचा वापर निवडणुकीत मते मिळविण्यासाठीही केला जात आहे. सत्ताधारी पक्ष अतिशय चतुराईने त्यांचा वापर करतो आहे. त्यामुळेच आजकाल शिकलेल्या लोकांमध्ये देखील मुस्लिमांचा द्वेष करणे ही फॅशन झाली आहे, असे शाह म्हणाले होते.

(हेही वाचा Love Jihad : जपानमध्ये वाढतेय मुस्लिमांची लोकसंख्या; ‘लव्ह जिहाद’ हे तर कारण नाही ना?)

काय म्हणाले मुकेश खन्ना?

आता यावर अभिनेते मुकेश खन्ना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत नसीरुद्दीन यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, एक उत्कृष्ट अभिनेता इतकी वाईट आणि बालिश कसे बोलू शकतो? हे नसीरुद्दीन शाह यांच्याकडे पाहून कळत आहे. असे म्हटले जाते की भारतात मुस्लिम सुरक्षित नाहीत? साक्षी, श्रद्धा, अंकिता कांड, कानपुर हनुमान मंदिरातील तोडफोड या व्यतिरिक्त दिवसा एका महिलेचे धड शरीरापासून वेगळे करण्याची वीभत्स घटना पाहूनही भारतात मुस्लिम सुरक्षीत नाहीत? जर या देशात कोणी सुरक्षित नाही तर ते हिंदू आहेत. तुम्ही कट्टर बनत चालले आहात आणि एक अभिनेता म्हणून ते योग्य नाही. असेच आहे तर लव जिहादच्या टीममध्ये सामील व्हा. तुम्हाला विचार करायला हवा नाही तर तुमचे चित्रपट प्रेक्षक पाहाणार नाहीत. भगवान तुम्हाला सद्बुद्धी देवो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.