Love Jihad : जपानमध्ये वाढतेय मुस्लिमांची लोकसंख्या; ‘लव्ह जिहाद’ हे तर कारण नाही ना?

जपानमधील मुस्लिमांची संख्या वाढण्याचे सर्वात मोठे कारण देशात होणारे आंतरजातीय विवाह आहेत असे म्हटले जाते. जपानमधील मुस्लिम लोक तिथल्या जपानी तरुणींशी विवाह करून त्यांचे धर्मपरिवर्तन करत आहेत.

118

भारतात ‘द केरला स्टोरी’ सारख्या चित्रपटात लव्ह जिहादचे सत्य उघड केलेले आपण पाहिलेच आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? लव्ह जिहादची अशी कितीतरी प्रकरणे फक्त भारतातच नाही तर जगभरात अनेक देशांमध्ये सुरू आहेत. त्यापैकीच एक देश आहे जपान. होय, मागच्या काही वर्षांपासून जपानचे धार्मिक दृश्य बदलताना दिसत आहे. गेल्या वीस वर्षांमध्ये जपानमधील मुस्लिमांच्या आणि मशिदींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 1999 ते 2000 सालापर्यंत जपानमधील मुस्लिम लोकसंख्या जवळपास 20,000 इतकी होती. ही संख्या आजच्या तारखेला 10 पट वाढली असून 2,00,000 इतकी, झाली आहे. तसेच जपानमधल्या मशिदींची संख्याही खूप कमी होती. त्यातही वाढ झाली आहे. 1999 पर्यंत संपूर्ण जपानमध्ये मशिदींची संख्या 15 इतकी होती. ती वाढून आता 113 पर्यंत गेली आहे. याबरोबरच जपानमधील धार्मिक तणाव वाढत आहे. यामागचे कारण आंतरजातीय विवाह आहे असे तिथल्या लोकांचे म्हणणे आहे.

मागच्या वर्षी ओसाका येथील निशीनारी वार्डमध्ये एका कारखान्यासारखी मशीद तयार केली गेली. ही मशीद तयार करण्यासाठी जगातला सर्वात मोठा मुस्लिम देश इंडोनेशिया येथून दान मिळाले होते. या घटनेनंतर जपानमधील धार्मिक वाद चिघळला आहे. यापूर्वी जपानमध्ये असे कधीही पाहायला मिळाले नव्हते.

जपानमधील मुस्लिमांची संख्या वाढण्याचे सर्वात मोठे कारण देशात होणारे आंतरजातीय विवाह आहेत असे म्हटले जाते. जपानमधील मुस्लिम लोक तिथल्या जपानी तरुणींशी विवाह करून त्यांचे धर्मपरिवर्तन करत आहेत. या कारणांमुळे जपानी लोकांमधील संताप वाढला आहे.

हल्लीच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपल्याला दिसते की एक मुस्लिम इसम ‘इथे फक्त एकच देव आहे, तो म्हणजे अल्ला आहे’ असे म्हणत एका महिलेला मारहाण करत आहे. एवढेच नव्हे तर गांबिया येथील एका जपानी धर्मस्थळाचीसुद्धा तोडफोड करण्यात आली आहे. हे वायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोक पेटून उठले आहेत आणि मुस्लिम धर्मियांच्या विरोधात कमेंट्स करत आहे.

जपानचा मूळ धर्म शिंतो आहे. या धर्माची आपल्या स्वतःच्या प्रथा आहेत. शिंतो धर्म हा जपानमधील लोककथा, तिथल्या चालीरीती आणि जीववादी विश्वासांवर विकसित झालेला आहे. या धर्माचा कोणी संस्थापक नाही किंवा याची कोणतेही अधिकारीक शास्त्र नाही. शिंतो धर्मामध्ये पावित्र्य, कृतज्ञता, भौतिक जग आणि सर्वात जास्त म्हणजे माणसातील सद्भावनेला फार महत्त्व आहे. शिंतो धर्मामध्ये इतर धर्मीयांशी मिळून मिसळून राहायला सांगितले जाते. अशाप्रकारचे सामंजस्य मुस्लिम धर्मीयांकडून घडत नाही हे तर सगळ्या जगाला माहिती झालेले आहे. याच कारणास्तव जपानमधील मुस्लिमांची वाढती लोकसंख्या पाहता दोन परस्परविरोधी धार्मिक गटांमध्ये तणाव वाढत चालला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.