Chitra Wagh : आव्हाडांसारखी औलाद महाराष्ट्रात जन्माला आली हेच दुर्देव – चित्रा वाघ

तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचं शस्त्र असतं.

144
Chitra Wagh : आव्हाडांसारखी औलाद महाराष्ट्रात जन्माला आली हेच दुर्देव - चित्रा वाघ

भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा खरपूस समाचार घेताना त्यांनी आव्हाडांसारखी औलाद महाराष्ट्रात जन्मली हेच दुर्देव आहे, अशी परखड टीका केली आहे.

चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, तुमचा मेंदू सडल्याचं मी बोलले आणि तुम्ही लगेच ते सिद्धही करून दाखवलं. माझ्या राजकीय मुद्द्यांवर तुम्ही वैयक्तिक पातळींवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करताय. तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचं शस्त्र असतं. मी यापूर्वीही अशा प्रसंगांना सामोरे गेले आहे. बहिण म्हणून चारित्र्यहनन करणारी तुमच्या सारखी औलाद महाराष्ट्रात जन्माली आली हेच दुर्देव आहे.

(हेही वाचा – Aurangzeb : औरंगजेब आणि मविआचा डीएनए एकच; चित्रा वाघ यांचा घणाघात)

माझा राजकीय प्रवास तुमच्यासारखा नाही. तुम्ही जेव्हा ‘कुलू मनाली’ करत होता तेव्हा माझा संघर्ष सुरू होता. परमारच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार आणि त्यातून वाचवा म्हणत किती जणांचे किती वेळा पाय धरलेत हे सर्वांना माहिती आहे. तुमच्या बॉडीगार्डची आत्महत्या होती की हत्या केली तुम्ही, त्याचीही चौकशी व्हायला हवी. तुमचा पीए कशामुळे तडीपार झाला, हेही लपून राहिलेलं नाही. पण मला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाही. तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे ते पोलिसच बाहेर काढतील, असेही चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या.

आव्हाड नाहीसचं तू हाड हाड आहेस …

मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारा गिधाड आहेस तू. तुमच्यासारख्या गिधाडांना मी सोडणार नाही आणि आत्ताही तुम्हाला पुरून उरणार. खुद को इज्जतदार बोलते हुए इज्जत औरत की उतारते हैं. आपकी तृष्णा कभी तृप्त नहीं होती है, आप रावणकाल के भूखे और लंघे हैं. आप हमाम के बाहर भी नंगे हैं….आव्हाड नाहीसचं तू हाड हाड आहेस आणि तीच तुझी लायकी आहे. राजकीय मुद्द्यांवर बोलता येत नसेल तर तुझं थोबाड बंद ठेव माझ्या नादी लागू नकोस हे लक्षात ठेव, असा इशाराही चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी दिला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.