धमकी देणे आमच्या रक्तात नाही, पवारांना धमकी देणाऱ्यास जेलमध्ये टाका; बावनकुळेंची मागणी

112
धमकी देणे आमच्या रक्तात नाही, पवारांना धमकी देणाऱ्यास जेलमध्ये टाका; बावनकुळेंची मागणी
धमकी देणे आमच्या रक्तात नाही, पवारांना धमकी देणाऱ्यास जेलमध्ये टाका; बावनकुळेंची मागणी

धमकी देणाऱ्यास तात्काळ अटक करुन त्याला जेलमध्ये टाकले पाहिजे. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला धमकी देणे ही रुची देणारी गोष्ट नाही. धमकी देणे आमच्या रक्तात नाही, जो कोणी असो त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना शुक्रवारी सकाळी ट्वीटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, त्या पार्श्वभूमीवर बावनकुळे बोलत होते. ते म्हणाले की, कोणत्याही पक्षाच्या नेत्याला धमकी देणे योग्य नाही. धमकी देणे आमच्या रक्तात नाही, जो कोणी असो त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

(हेही वाचा – BJP Meeting : भाजप मुख्यमंत्र्यांची 11 जूनला दिल्लीत बैठक; पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार ‘गुरुमंत्र’)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी मेळाव्यावरही चंद्रशेखर बावनकुळेंनी भाष्य केले. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसींचा शत्रू आहे. छगन भुजबळ सोडले तर राष्ट्रवादीत ओबीसी नेत्यांना संधी मिळत नाही. नागपूरच्या शिबिरात ठराव करुन महाराष्ट्राचे किंवा राष्ट्रीय अध्यक्षपद ओबीसीला देतील, अशी अपेक्षा होती. त्यांच्या सरकारमध्ये ओबीसीला काहीच मिळाले नाही.

पुढे चंद्रशेखर बावनकुळे संजय राऊतांविषयी म्हणाले, संजय राऊत हे सकाळी नॅरेटीव्ह सेट करुन दिवसभर बातमी चालवतात. संजय राऊतांवर नितेश राणे काय ती योग्य प्रतिक्रिया देतील. तर मुख्यमंत्री काही काळासाठी आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी गेले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.