दहिसर जकात नाक्याच्या जागेवर उभारणार अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त सार्वजनिक प्रसाधनगृह

112
दहिसर जकात नाक्याच्या जागेवर उभारणार अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त सार्वजनिक प्रसाधनगृह
दहिसर जकात नाक्याच्या जागेवर उभारणार अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त सार्वजनिक प्रसाधनगृह

दहिसर (पूर्व) परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर जकात नाक्याजवळ अद्ययावत सोयी-सुविधांनीयुक्त सार्वजनिक प्रसाधनगृहाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्त्री, पुरुष, तृतीय पंथीयांसह दिव्‍यांगांसाठी स्वतंत्र शौचालय, सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष, बाळांचे डायपर बदलण्यासाठी जागा, पिण्याच्या पाण्याची सोय, मोबाइल चार्जिंग आणि पेय पदार्थांसह ‘एटीएम’ची देखील सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे प्रसाधनगृहाच्या छतावर सौर ऊर्जा संयंत्र स्थापन होणार असून त्यापासून वीज निर्मितीही होणार आहे.

दहिसर (पूर्व) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर १२ हजार ९१६ चौरस फूट एवढ्या प्रशस्त जागेमध्ये सर्व सोयींनीयुक्त सार्वजनिक प्रसाधनगृहाची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘आर उत्‍तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त नयनीश वेंगुर्लेकर यांनी दिली आहे. पुरुषांसाठी ५ शौचकूप, महिलांसाठी ५ शौचकूप आणि दिव्यांगांसाठी १ शौचकूप यामध्ये समाविष्ट असेल.

मुख्य रस्ते व द्रुतगती महामार्गावर प्रसाधनगृहाची सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली, तर नागरिकांची सोय होईल, या उद्देशाने या सार्वजनिक प्रसाधनगृहाची उभारणी करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामार्फत त्याची दैनंदिन स्वच्छता व देखरेख करण्यात येणार आहे. कार्यादेश निघाल्यानंतर १२ महिन्यात या प्रसाधनगृहाचे बांधकाम पूर्ण होईल, असेही सहायक आयुक्त नयनीश वेंगुर्लेकर यांनी कळविले आहे.

(हेही वाचा – हेल्पलाईनवरील केवळ ७० टक्केच कचऱ्याच्या तक्रारी सोडवता आल्या महापालिकेला)

त्यात सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष, बाळांचे डायपर बदलण्यासाठी समर्पित जागा अशा सुविधा असणार आहेत. पिण्यासाठी शुद्ध पाणी, मोबाइल चार्जिंग, एटीएमची सुविधा देखील यामध्ये प्रस्तावित आहे. या ठिकाणी चहा कॉफीसह पेय पानाची देखील व्यवस्था असणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह सभोवतालच्या जागेवर रंगीत फुलांची झाडे लावण्यात येणार आहेत.

सौर ऊर्जा निर्मिती होण्याच्या दृष्टीने या प्रसाधनगृहाच्या छतावर सौर ऊर्जाचे पॅनल लावण्यात येणार आहे. या पॅनलमधून विजेची निर्मिती होणार आहे. ही वीज विद्युत पुरवठा कंपनीला देण्यात येणार असून मासिक वीज बिलातून सदर रक्कम वजा केली जाणार आहे. साहजिकच प्रसाधनगृहाच्या मासिक खर्चात बचत होईल. त्याहीपुढे जात पावसाचे पाणी पुनर्भरण / संचयन करण्याची देखील तजवीज केली जाणार आहे. एकूणच, या प्रसाधनगृहाच्या निर्मितीतून पर्यावरण पूरकताही साधली जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.