Ayodhya रामलला दर्शनाच्या आस्था ट्रेनवर उत्तर प्रदेशात दगडफेक

रामलला दर्शनासाठी सुरु केलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस-सालारपुर या परतीच्या मार्गावरील आस्था स्पेशल ट्रेनवर लखनौपासून १५ किमी अंतरावर बाराबंकी आणि मल्होर स्टेशन दरम्यान (उत्तर प्रदेश) दगडफेक झाल्याची तक्रार काही भाविकांनी केली.

867
Ayodhya रामलला दर्शनाच्या आस्था ट्रेनवर उत्तर प्रदेशात दगडफेक
Ayodhya रामलला दर्शनाच्या आस्था ट्रेनवर उत्तर प्रदेशात दगडफेक
  • सुजित महामुलकर
लखनौ (उत्तर प्रदेश, आस्था स्पेशल ट्रेनमधून): भारतीय जनता पार्टीने (भाजपा) (BJP) रामलला दर्शनासाठी सुरु केलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस-सालारपुर या परतीच्या मार्गावरील आस्था स्पेशल ट्रेनवर लखनौपासून १५ किमी अंतरावर बाराबंकी आणि  मल्होर स्टेशन दरम्यान (उत्तर प्रदेश) दगडफेक झाल्याची तक्रार काही भाविकांनी केली. या प्रकरणाची चौकशी सुरु केल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना सांगितले. (Ayodhya)
दोन्ही बाजूच्या खिडकीवर एक-एक दगड
अंधेरी उत्तर पश्चिम जिल्हा मोर्चा सरचिटणीस वनीता गावंड (Vanita Gawand) यांनी सांगितले की, “पोलिसांनी खिडक्या बंद करण्याच्या सूचना केल्या आणि मल्होर स्टेशनजवळ काही मिनिटातच दोन्ही बाजूच्या खिडकीवर एक-एक दगड आला. सुदैवाने खिडकीची काच फुटली नाही, नाहीतर खिडकीजवळ बसलेला स्वप्नील जखमी झाला असता.” (Ayodhya)
खिडक्या बंद करण्याच्या सूचना आधीच दिल्या होत्या 
खिडकीजवळ बसलेला तरुण आणि अंधेरी मालपा डोंगरीचा रहिवासी स्वप्नील कदम म्हणाला, “खिडकीतून मोबाईल किंवा काही वस्तू चोरी होऊ शकते म्हणून खिडकी बंद करा, अशा सूचना पोलिसांनी दिल्यानंतर आम्ही काचेची खिडकी बंद केली, मात्र बाहेरची पत्राजाळी असलेली खिडकी उघडी ठेवली. काही वेळातच  अचानक दगड आला आणि खिडकीवर आदळला. तसाच दुसऱ्या बाजूच्या खिडकीवरही एक दगड आला,” असे स्वप्नीलने हिंदुस्थान पोस्टशी बोलताना सांगितले. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी स्वप्नीलने (Swapni) केली. (Ayodhya)
त्यानंतर काही वेळात गाडी थांबली आणि पोलीस आले. त्यांनी माहिती विचारली. “जे घडले ते मी सांगितले,” स्वप्नील (Swapni) म्हणाला. (Ayodhya)
ही आस्था स्पेशल ट्रेन ३ मार्चला मुंबईहून सुटली आणि काल दुपारी १२.१५ वाजता सालारपुरला पोहोचली. आज बुधवारी सायंकाळी ४.४० वाजता गडी परतीच्या मार्गावर असताना साधारण ६.३० च्या दरम्यान कथित दगडफेकीची घटना घडली. (Ayodhya)
पोलिस जबाबदार 
गावंड यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांना जबाबदार धरले. “पोलिसांना माहिती होते की या पट्ट्यात असे दगडफेकीचे प्रकार होतात तर त्यांनी आधीच बंदोबस्त का नाही केला,” असा सवाल गावंड यांनी केला. (Ayodhya)
लखनौ स्टेशनला गाडी थांबल्यावर रेल्वे पोलीसांनी या प्रकरणाची दखल घेत एस-४ या डब्यातील प्रवाशांकडून अधिक माहिती घेतली आणि चौकशी करू, असे सांगितले. (Ayodhya)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.