Autorikshaw Taxi : ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध 1865 तक्रारी प्राप्त; 739 परवाने निलंबित

व्हॉट्सॲप व ईमेल आयडीवर 11 जुलै 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत 1865 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

245
Autorikshaw Taxi : ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध 1865 तक्रारी प्राप्त; 739 परवाने निलंबित
Autorikshaw Taxi : ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध 1865 तक्रारी प्राप्त; 739 परवाने निलंबित

ऑटोरिक्षा व टॅक्सी (Autorikshaw Taxi) चालकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे या संदर्भातील तक्रार आता व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करता येते. त्यासाठी 9152240303 क्रमांक व [email protected] ईमेल आयडी प्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) यांनी उपलब्ध करून दिला आहे. ऑटोरीक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध आतापर्यंत 1865 तक्रारी प्राप्त झाल्या असून दोषी आढळलेल्या 739 परवानाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.

व्हॉट्सॲप व ईमेल आयडीवर 11 जुलै 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत 1865 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित कार्यालयाशी निगडीत 790 तक्रारी आहेत. त्यापैकी 672 तक्रारी या ऑटोरिक्षा व 118 तक्रारी या टॅक्सी सेवे संबंधीत आहेत. तक्रारींमध्ये 588 तक्रारी ठोस कारणाशिवाय भाडे नाकारणे, 59 तक्रारी या मीटरप्रमाणे देय असलेल्या भाडयापेक्षा जादा भाडे आकारणे व 143 तक्रारी प्रवाशांशी गैरवर्तन करणे याबाबत प्राप्त झाल्या आहेत. त्याचप्रमाणे 790 परवानाधारकांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. दोषी आढळलेल्या एकूण 739 परवानाधारकांचे परवाना निलंबित करण्यात आले आहे. यापैकी 557 परवानाधारकांचे ठोस कारणांशिवाय भाडे नाकारणे या कारणासाठी परवाने 15 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईत 66 वाहनधारकांकडून 1 लाख 63 हजार 500 रूपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. तसेच 128 परवानाधारकांचे प्रवाशांशी गैरवर्तन करणे, 54 परवानाधारकांचे मीटरप्रमाणे देय असलेल्या भाडयापेक्षा जादा भाडे आकारणे या कारणासाठी परवाने 10 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. या सर्व प्रकारांमध्ये एकूण 96 प्रकरणात 2 लाख 37 हजार रूपये तडजोड शुल्क वसूल केले आहे.

(हेही वाचा – Mechanized Parking : वरळी हबच्या ठिकाणी बांधले जाणार सुमारे ७५० वाहनांसाठी यांत्रिकी वाहनतळ)

तसेच 37 तक्रारींबाबत तक्रारदारांनी चुकीची तक्रार नोंद केल्याबाबत तक्रारदारांना अवगत केले आहे. तसेच सद्यस्थितीत परवाना निलंबित करण्यात आलेल्या 643 वाहनांची वाहन 4.0 प्रणालीवर ‘नॉट टू बी ट्रान्सक्टेड’ नोंद (पाहिजे नोंद) घेण्यात आली आहे. कारवाईच्या माहितीबाबत तक्रारदारांना व्हॉट्सॲप व ई-मेल आयडीवर या माध्यमांतून अवगत करण्यात आले आहे.

प्रवासी नागरिकांनी संबंधित कार्यालयाकडे केलेल्या तक्रारींची कार्यालयाकडून गांभीर्याने दखल घेण्यात येत आहे, याबाबत प्रवाशांनी आश्वस्त रहावे. परवानाधारकांनी नागरिकांना चांगली सेवा द्यावी आणि नागरिकांशी गैरवर्तन करू नये, असे आवाहन कार्यालयाकडून करण्यात येत आहे. खोटी तक्रार दाखल करणे हा भारतीय दंड विधान कलम 192, 193, 199 व 200 अंतर्गत दंडनीय अपराध आहे. या कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेल्या प्रवासी तक्रार मदत कक्षाला नागरिक उत्तमप्रकारे प्रतिसाद देत आहेत. नागरिकांना ऑटोरिक्षा/टॅक्सी (Autorikshaw Taxi) चालकांकडून गैरवर्तन भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा दराने भाडे आकारणे आदी तक्रारी असतील, तर 9152240303 या व्हॉट्सॲप क्रमांकावर आणि mh०३[email protected] या ईमेल आयडीवर योग्य त्या पुराव्यासह तक्रार दाखल करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.