महाराष्ट्रात घातपाताचा प्रयत्न; श्रीवर्धनमध्ये सापडल्या संशयास्पद बोटी, AK-47 सापडल्याने खळबळ

182

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे दोन संशयास्पद बोटी आढळून आल्या आहेत. या बोटींमध्ये दोन ते तीन AK-47 रायफल आढळून आल्या आहेत. या घटनेमुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी रायगड जिल्ह्याला हायअलर्ट  जारी केला आहे.

श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी दोन बोटी सापडल्याची माहिती आहे. त्याशिवाय एके-47 रायफल्सच्या बुलेट्स आढळून आल्या आहेत. तसेच, भरडखोल येथील किना-याजवळ आढळलेल्या बोटीत लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आले आहे. याप्रकरणात  कोणतीही व्यक्ती आढळलेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बोट ताब्यात घेण्यात आली आहे. सध्या याबाबत पुढील तपास सुरु आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांना संशयास्पद बोटी आढळल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार, पोलिसांकडून गस्त घालण्यात येत होती, त्यपैकी दोन बोटी आज श्रीवर्धन येथे आढळून आल्या आहेत.

( हेही वाचा: मंत्री गुलाबराव पाटलांना उपसभापतींनी झापले, म्हणाल्या… )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.