Atal Setu आजपासून खुला, आता २ तासांच्या प्रवासाला लागणार फक्त २० मिनिटं

अवजड वाहने – या श्रेणीतील वाहनांसाठी एका बाजूने १८५० रुपये, तर दोन्ही बाजूंसाठी २३७० रुपये इतका टोल भरावा लागेल. तर दैनंदिन पाससाठी ३९५० रुपये आणि मासिक पाससाठी ७९ हजार रुपये टोल आकारला जाणार.

225
Atal Setu आजपासून खुला, आता २ तासांच्या प्रवासाला लागणार फक्त २० मिनिटं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवार, १२ जानेवारी रोजी शिवडी – न्हावा शेवा अटल सागरी सेतूचे (Atal Setu) उदघाटन करण्यात आले. २१.८ किमी लांबीच्या या सागरी सेतूविषयी आता अनेकांना प्रवास करण्याची इच्छा झाली आहे. आजपासून म्हणजेच शनिवार १३ जानेवारी पासून हा सेतू सर्वसामान्य माणसांसाठी खुला झाला आहे. त्यामुळे आता २ तासांच्या प्रवासासाठी २० मिनिटे लागणार आहेत.

पण या सेतूवरून(Atal Setu) प्रवास करताना कोणत्या वाहनाला किती रुपये टोल आहे, कोणत्या वाहनांना परवानगी आहे, वेग मर्यादा किती असेल याची आधी माहिती जाणून घेण्याची आवश्यकता आहे.

अटल सेतूवर ‘या’ वाहनांना परवानगी नाही –

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटल सेतूवरुन (Atal Setu) दुचाकी वाहनं, ऑटो रिक्षा, टॅक्टर , मोपेड, तीन चाकी टेम्पो, कमी वेगानं चालणारी वाहनं, बैलगाडी अथवा घोडागाडी, मुंबईकडे जाणारी मल्टी एक्सल जड वाहनं, ट्रक आणि बसला जाण्यास परवानगी नसेल.

(हेही वाचा – Ind vs Eng Test Series : मोहम्मद शामी, ईशान किशन यांचा विचार नाही, ध्रुव जेरेल एकमेव नवीन चेहरा)

केवळ ‘या’ वाहनांना परवानगी –

कार, टॅक्सी, कमी वजनाची वाहनं, मिनी बस, टू एक्सल बस, लहान ट्रक.

किती असेल वेगमर्यादा ?

अटल सेतू महामार्गाची रचना ताशी १०० किमी वेगमर्यादेनुसार करण्यात आली आहे. पूर्वी महामार्गावरून ताशी ८० किमी वेगमर्यादा ठेवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला होता. आता सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला झाला असून ताशी १०० किमी अशी वेगमर्यादा ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. (Atal Setu)

(हेही वाचा – Local services : ‘पुणे ते लोणावळा’दरम्यान बंद असलेली लोकल सेवा पुन्हा सुरू होणार, जाणून घ्या वेळ)

अटल सेतूवर किती आकारला जाणार टोल? 

१. कार/चारचाकी – चारचाकी वाहनांच्या एकेरी वाहतुकीसाठी २५०, तर दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी ३७५ रुपये इतका टोल आकारण्यात येईल. दैनंदिन पाससाठी ६२५ तर मासिक पाससाठी १२ हजार ५०० रुपये (Atal Setu)

२. मिनीबस  – छोट्या बसेससाठी एका बाजूने ४००, तर दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी ६०० रुपये टोल आकारला जाईल. दैनंदिन पाससाठी १ हजार तर मासिक पाससाठी २० हजार रुपये.

(हेही वाचा – Jammu and Kashmir : पुंछ सेक्टरमध्ये भारतीय सैन्याच्या वाहनावर हल्ला)

३. छोटे ट्रक/वाहने (२ एक्सेल)  –  छोट्या ट्रकसाठी एका बाजूच्या वाहतुकीसाठी ८३०, तर दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी १२४५ रुपये इतका टोल आकारला जाईल. दैनंदिन पाससाठी २०७५ तर मासिक पाससाठी ४१ हजार ५०० रुपये.

४. एमएव्ही (३ एक्सेल) – या प्रकारच्या वाहनांसाठी एकेरी वाहतुकीला ९०५ रुपये, तर दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी १३६० रुपये इतका टोल भरावा लागेल. दैनंदिन पाससाठी २२६५ तर मासिक पाससाठी ४५ हजार २५० रुपये. (Atal Setu)

५. मोठे ट्रक/वाहने (४-६ एक्सेल) – या प्रकारच्या वाहनांना एका बाजूने १३०० रुपये, तर दोन्ही बाजूंसाठी १९५० रुपये इतका टोल भरावा लागेल. तर दैनंदिन पाससाठी ३२५० रुपये आणि मासिक पाससाठी ६५ हजार रुपये.

६. अवजड वाहने – या श्रेणीतील वाहनांसाठी एका बाजूने १८५० रुपये, तर दोन्ही बाजूंसाठी २३७० रुपये इतका टोल भरावा लागेल. तर दैनंदिन पाससाठी ३९५० रुपये आणि मासिक पाससाठी ७९ हजार रुपये टोल आकारला जाणार. (Atal Setu)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.