Atal Setu : ‘अटल सेतू’वरून बेस्ट बस सुरू

2055

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू अर्थात ‘अटल सेतू’वरून आजपासून (गुरुवार) बेस्ट बस धावायला सुरुवात झाली आहे. जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर) आणि कोकण भवन या दोन भागांना जोडणारी नवीन वातानुकूलित प्रीमियम बस सेवा, बस मार्ग क्रमांक एस-१४५ सुरू केली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या बेस्ट प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. (Atal Setu)

अटल सेतू २१.८ किलोमीटर लांब असून १६.५ किमी मार्ग समुद्रावरून जातो. आतापर्यंत १० लाखांहून अधिक वाहने या सेतूवरून धावली आहेत. तसेच फास्ट टॅगद्वारे १३ कोटींहून अधिक, तर रोख रकमेद्वारे ८७ लाखांहून अधिक टोल वसूली झाली आहे. (Atal Setu)

(हेही वाचा- Pankaja Munde : पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर परळीत फटाके फोडून केला जल्लोष)

दरम्यान अटल सेतूवरून सामान्यांना परवडेल, अशी बससेवा या मार्गावर सुरू केली जावी, अशी प्रवाशांची मागणी होती. ती बेस्ट प्रशासनाने मान्य करत ही प्रीमियम बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ते शनिवार दरम्यान ही सेवा सुरू असणार आहे. दैनंदिन प्रवाशांना वाहतुकीसाठी नवा पर्याय तयार झाला आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर, यशवंतराव चव्हाण सेंटर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (जीपीओ) यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना ही बस जोडली गेली आहे. या मार्गावर सुरुवातीला दोन वातानुकूलित बस चालवण्यात येतील. ज्यामुळे प्रवाशांना आरामदायी आणि वातानुकूलित सेवा मिळेल. सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी या फेऱ्या असल्याने इतर वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होईल. याआधी प्रायोगिक तत्त्वावर या मार्गाची चाचपणीही केली. प्रवाशांनी बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (Atal Setu)

(हेही वाचा- Neelam Gorhe : स्त्रियांचा सन्मान म्हणजेच स्त्रीचा अधिकार – नीलम गोऱ्हे)

कसा असेल मार्ग

कोकण भवन, सीबीडी बेलापूर येथून सकाळी ७.३०, सकाळी ८ वाजता आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर येथून सायंकाळी ५.३० वाजता तसेच सायंकाळी ६ वाजता, अशा दोन बस फेऱ्या धावतील. जागतिक व्यापार केंद्र, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र (मंत्रालय), डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (जीपीओ), पूर्व मुक्त मार्ग अटल सेतू (उड्डाणपूल) उलवे नोड – किल्ले गावठाण बामणडोंगरी रेल्वे स्थानक, कोकण भवन सीबीडी बेलापूर. (Atal Setu)

असे असेल भाडे

वर्ल्ड ट्रेड सेंटर ते कोकण भवन, सीबीडी बेलापूर प्रवासी भाडे २२५ रुपये असेल. या बसचे किमान भाडे ५० रुपये आणि कमाल भाडे २२५ रुपये असेल. कोकण भवन ते सीएसएमटी (जीपीओ) २०० रुपये भाडे असेल.(Atal Setu)

(हेही वाचा- Clean Ministry : मंत्रालय स्वच्छ आणि नीटनेटके राहण्यासाठी राज्य शासनाने काढला आदेश!)

ॲपवरून आरक्षणाची सोय

प्रीमियम बस सेवेचे उद्दिष्ट दोन व्यावसायिक केंद्रामधील अंतर १०० मिनिटांत पार केले जाईल. यासाठी प्रीमियम बस सेवा ॲपवरून आरक्षित करून प्रवास करता येईल. (Atal Setu)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.