84 वर्षीय पतीला मिळणार पत्नीकडून पोटगी, राज्यातील पहिलीच घटना

100

कौटुंबिक वादाशी संबंधित असंख्य खटल्यांवर दररोज न्यायालयात खटले चालवले जातात. या वादातून ब-याचदा पतीकडून पत्नीला पोटगी द्यावी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. पण अलीकडेच पुण्यातील एका प्रकरणात 84 वर्षीय पतीला आपल्या 74 वर्षीय पत्नीकडून पोटगी मिळणार आहे. कौटुंबिक न्यायालयाने याबाबतचा आदेश दिला आहे. अशाप्रकारे आदेश देण्यात आल्याचे राज्यातील हे पहिलेच प्रकरण असल्याचे अर्जदार पतीच्या वकील अॅड. वैशाली चांदणे यांनी म्हटले आहे.

25 हजारांची पोटगी

84 वर्षाचे पती आणि 74 वर्षीय पत्नी यांनी 55 वर्ष संसार केल्यानंतर 2018 साली घटस्फोट घेतला. 1964 साली हे दाम्पत्य विवाहबंधनात अडकले होते. त्यांना दोन विवाहित मुली देखील असून पती हे एका शिक्षणसंस्थेचे संचालक आहेत आणि पत्नी ही त्याच संस्थेची अध्यक्ष आहे. पतीने पत्नीविरोधात केलेल्या अर्जात न्यायालयाने पतीच्या बाजूने निकाल दिला असून, पत्नीला आता 84 वर्षीय पतीला दरमहा 25 हजार रुपयांची अंतरिम पोटगी द्यावी लागणार आहे.

(हेही वाचाः बीए व्हेरिएंटचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत दिवसभरात कोरोनाने पाच जणांचा मृत्यू)

काय आहे प्रकरण?

अर्जदार पतीला मधुमेह आणि हृदयविकारासारखे आजार असल्यामुळे त्यांमा वेळेवर जेवण आणि औषध घेणे आवश्यक आहे. पण तरीही त्यांच्या पत्नीकडून त्यांची योग्यप्रकारे काळजी घेण्यात येत नसल्याचे त्यांनी अर्जात म्हटले होते. पत्नीच्या दुर्धर आजारात पतीने तिची सगळी काळजी घेतलेली असताना सुद्धा पत्नीचे त्यांच्यासोबतचे वागणे योग्य नसल्यामुळे दोघांनी घटस्फोट घेतला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.