Asiatic Lions : गुजरात सरकारने राज्यातील सिंहा(Asiatic Lions)ची गणना केली असून त्याची माहितीही जाहीर केली आहे. या गणनेदरम्यान गुजरातमधील आशियाई सिंहां(Asiatic Lions)ची आकडेवारी समोर आली असून २०२० मधील आकडेवारीपेक्षा यंदा अधिक संख्या दिसून आली आहे. दरम्यान, २०२० मध्ये आशियाई सिंहां(Asiatic Lions)ची संख्या ६७४ इतकी होती तर आता नवीन आकडेवारीनुसार सद्यस्थितीस ८९९ आशियाई सिंह असल्याचे समोर आले आहे.(Asiatic Lions)
(हेही वाचा Iran-Israel War : इराणमधील अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला केल्याचा इस्त्रायली सैन्याचा दावा )
विशेष म्हणजे, मागील ५ वर्षांत गुजरातमध्ये सिंहां(Asiatic Lions)ची संख्या ३२.२ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. पण यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अर्धे सिंह राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यांसारख्या संरक्षित वनक्षेत्रात नसून मानवी वस्ती असलेल्या भागात राहत असल्याचे दिसून आले आहे. सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, २०२० पर्यंत सौराष्ट्र प्रदेशात ३० हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर सिंह होते तेच प्रमाण आता ३५ हजार चौरस किलोमीटरपर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, सिंहां(Asiatic Lions)च्या वाढलेल्या आकडेवारीनंतर आता गावात सिंह येत असल्याची तक्रार स्थानिक करत आहेत. तसेच, गुजरातमधील काही गावात रस्त्यांवर सिंह फिरत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहे.
मुलांना झोपण्यासाठी पिंजरा तयार केला
सिंहांच्या वाढत्या आकडेवारीनंतर नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत स्थानिकांनी माध्यमाशी संवाद साधला. त्यांनी सांगितले, जाफराबादच्या भाकोदर गावात भरतभाई राहतात. ०६ महिन्यांपूर्वी भरतभाईंच्या पत्नीचा मुलाला जन्म देताना मृत्यू झाला. त्यानंतर भरतभाईंचे वडील खिमाभाई यांचे ०२ महिन्यानंतर निधन झाले. त्यांच्या निधनानंतर, नवजात मुलगा, ०५ मुली व आईची काळजी घेण्याची जबाबदारी भरतभाईंवर आली. ते पुढे म्हणाले, माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर मला आमच्या घराजवळ एक बिबट्या दिसला. तेव्हापासून मला माझ्या मुलांच्या सुरक्षिततेची खूप काळजी वाटत होती. मी १० हजार रुपये खर्चून घरात एक मोठा पिंजरा बांधला. आम्ही रात्रीही काम करत असल्यानं मुलांना त्या पिंजऱ्यात झोपवतो, असेही ते म्हणाले.
मानव-प्राणी संघर्षाबद्दल तज्ज्ञांचं म्हणणं काय?
प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार व पर्यावरणतज्ज्ञ भूषण पंड्या यांच्याशी संवाद साधताना ते म्हणाले, जेव्हा सिंह नवीन क्षेत्रात जातात तेव्हा त्यांना मानव आणि इतर सिंहां(Asiatic Lions)ची देखील भीती वाटते. त्यांनी पुढे सांगितले, सिंह फिरत असलेल्या परिसरात लोक गेले तेव्हा सुरुवातीला सगळ्यांना भीती वाटली. त्यांना वाटत होतं की सिंह लहान मुलांवर हल्ला करेल. पण, त्यांना हे माहिती नव्हतं की सिंह देखील घाबरतात. सिंह हा सर्वात मोठा मांसाहारी प्राणी आहे. त्यामुळे लोक सावध असतात. एका भागातले सिंह दुसऱ्या परिसरातल्या सिंहांना आपल्या परिसरात येऊ देत नाहीत, असेही एएनआयशी बोलताना सांगितले.
गुजरात सरकारने काय म्हटले?
वनक्षेत्रात आशियाई सिंहां(Asiatic Lions)ची संख्या वाढल्याने मानव-वन्यजीव संघर्ष वाढेल, असे मला वाटत नाही, असे गुजरात सरकारचे मुख्य वनसंरक्षक जयपाल सिंह म्हणाले. ते पुढे म्हणाले, आशियाई सिंहांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढेल याची चिंता नाही. पण या भागात बिबट्याचा लोकांना त्रास असून वर्षभरात मानवांवर झालेल्या २० वन्यजीव हल्ल्यांपैकी १९ हल्ले बिबट्यांनी केले आहेत. सरकार हा संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.(Asiatic Lions)
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी २१ मे २०२५ रोजी गांधीनगर येथे अद्ययावत आकडेवारी जाहीर केली. त्यांनी नमूद केले की, सिंह आता गिर राष्ट्रीय उद्यानाच्या पलीकडे आढळत असून २१७ सिंहांची वाढ उल्लेखनीय आहे. परंतु, तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे सौराष्ट्र प्रदेशातील ११ जिल्ह्यांमध्ये त्यांची वाढलेले वास्तव्य, ज्यामध्ये किनारी व वन नसलेले क्षेत्र समाविष्ट आहेत, असे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.
Join Our WhatsApp Community