Israel Hamas Conflict : असदुद्दीन ओवेसींनीही घेतली आतंकवाद्यांची बाजू; म्हणाले, पॅलेस्टाईन लाँग लिव्ह

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डही या लढ्यात उतरला आहे. एआयएमपीएलबीने म्हटले आहे की, हे युद्ध इस्रायल आणि मस्जिद अल-अक्सा यांच्या अत्याचाराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. पॅलेस्टाईनच्या प्रतिक्रियेला दहशतवाद म्हणणे म्हणजे पीडितांवर अन्याय करणे होय.

67
Israel Hamas Conflict : असदुद्दीन ओवेसींनीही घेतली आतंकवाद्यांची बाजू; म्हणाले, पॅलेस्टाईन लाँग लिव्ह
Israel Hamas Conflict : असदुद्दीन ओवेसींनीही घेतली आतंकवाद्यांची बाजू; म्हणाले, पॅलेस्टाईन लाँग लिव्ह

हमासने आतंकवादी हल्ला केल्यानंतर इस्रायलने हमासच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. (Israel Hamas Conflict) 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायली लष्कर गाझा पट्टीवर सातत्याने हवाई हल्ले करत आहे. या युद्धात 1200 इस्रायली नागरिक आणि 950 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धानंतर भारतात राजकीय युद्ध सुरू आहे. काँग्रेसने यापूर्वीच पॅलेस्टिनच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे. (Israel Hamas Conflict)

(हेही वाचा – Ind vs Pak : भारता विरुद्धच्या सामन्यात काय असेल पाकिस्तानची रणनीती?)

आता एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही हमासला आणि हिंसाचाराला पाठिंबा दिला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करून पॅलेस्टाईन जिंदाबादचा नारा दिला आहे. असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “पॅलेस्टाईन चिरंजीव राहो ! हिंसाचार मस्जिद अल अक्सा चिरंजीव.” (Israel Hamas Conflict)

इस्रायल-पॅलेस्टाईन वादात एआयएमपीएलबीचा प्रवेश, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डही या लढ्यात उतरला आहे. एआयएमपीएलबीने म्हटले आहे की, हे युद्ध इस्रायल आणि मस्जिद अल-अक्सा यांच्या अत्याचाराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. पॅलेस्टाईनच्या प्रतिक्रियेला दहशतवाद म्हणणे म्हणजे पीडितांवर अन्याय करणे होय. (Israel Hamas Conflict)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.