Arboriculture Conference : सरकारने दोन कोटी झाडे लावली कुठे?

मुंबईत झाडे लावण्यास जागाच शिल्लक नाही

742
Arboriculture Conference : सरकारने दोन कोटी झाडे लावली कुठे?

दोन कोटी झाडे लावण्याची सरकारची घोषणा आपण पाहिली आहे. पण ती झाडे कुठे आणि कोणत्या ठिकाणी लावली गेली आहेत असा आश्चर्यकारक सवाल वर्गीकरणशास्त्रज्ञ आणि सेंट झेवियर्स महाविद्यालय मुंबईचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे यांनी केला. झाडे लावण्यासाठी शहरात जागाच उरली नसल्याचे सांगत शिंदे यांनी मुंबईत झाडे लावण्यासाठी जागाच नाही. झाडे लावणार कुठे असा सवाल करत रस्त्यालगतची वृक्षारोपण एवढीच पर्याय आहे, असल्याचे शनिवारी वांद्रे येथील कार्यक्रमात बोलताना नमूद केले. (Arboriculture Conference)

सन २०१८ च्या वृक्षगणनेची आकडेवारी नागरिकांना उपलब्ध नाही!

भारतात प्रथमच, वैभव राजे, संचालक, ॲमेनिटी केअर ट्री असोसिएशन (ACTA) यांच्या पुढाकाराने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय आर्बोरीकल्चर कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील वांद्रे येथे सुरू असलेल्या प्रथम आंतरराष्ट्रीय आर्बोरीकल्चर (वृक्ष संगोपन) परिषदेत ‘अ जर्नी थ्रू द आर्बोरियल लेगसी ऑफ मुंबई’ या विषयावरील सत्रात प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे हे बोलत होते. ते म्हणाले, जरी मुंबई महापालिकेने २०१८ च्या वृक्ष सर्वेक्षणात शहरात झाडांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचा दावा केला असला तरी २०१८ च्या वृक्षगणनेची आकडेवारी अजूनही नागरिकांना उपलब्ध नाही. त्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. (Arboriculture Conference)

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सारख्या जागेचे संरक्षण महत्वाचे

दोन दिवसीय परिषदेच्या पहिल्या दिवशी, प्रसिद्ध ब्रिटीश आर्बोरिस्ट जेरेमी बॅरेल यांच्या “ट्रीएएच: इंटरनॅशनल ट्री असेसमेंट फॉर हेरिटेज” या पुस्तकाचे अनावरण त्यांच्या जगभरातील हेरिटेज वृक्षांवरील कामांवर आधारित करण्यात आले. शहरी वनीकरणावरील जगप्रसिद्ध तज्ज्ञ सेसिल कोनियानडाईक, नेचर बेस्ड सोल्युशन्स इन्स्टिट्यूट, नेदरलँड्स यांनी मुंबईसारख्या शहरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सारख्या जागेचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. (Arboriculture Conference)

(हेही वाचा – Urmila Matondkar : उत्तर मुंबई काँग्रेसच्या वाट्याला; उर्मिला मातोंडकर यांचे काय होणार?)

वृक्षप्रेमींमध्ये आर्बोरीकल्चरबद्दल जागरूकता आवश्यक…

आंतरराष्ट्रीय आर्बोरीकल्चर (वृक्षासंगोपन) परिषदेविषयी बोलताना वैभव राजे म्हणाले की, मुंबई आणि देशात वेगाने पायाभूत सुविधांचा विकास होत असताना शहरातील प्रत्येक झाड वाचवण्यासाठी आपल्याला मोठा संघर्ष करावा लागत आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक तज्ञांना एका व्यासपीठावर आणण्याचे कारण म्हणजे मुंबई आणि संपूर्ण भारतात आर्बोरीकल्चरमध्ये सर्वोत्तम व्यवस्थापन पद्धती लागू करणे हे आहे. तसेच पर्यावरणवादी आणि वृक्षप्रेमींमध्ये आर्बोरीकल्चरबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी देखील मदत होत आहे, असे राजे पुढे म्हणाले. (Arboriculture Conference)

हवामान बदलाचा झाडांवर होणारा परिणाम

आर्बोरीकल्चरल असोसिएशन यूकेचे सीईओ जॉन पार्कर यांनी ‘आर्बोरीकल्चर’ बद्दल जागरुकता कशी वाढवली पाहिजे याबद्दल बोलले आणि त्यासाठी ‘ट्री केअर’ हा सोपा शब्द वापरला. तसेच, सीझन वॉच इंडियाचे प्रकल्प समन्वयक सई गिरधारी यांनी ‘झाडांच्या माध्यमातून हवामान बदलाचा मागोवा घेणे’ या विषयावरील सत्राला संबोधित केले, भारतातील सामान्य झाडांच्या प्रजातींवरील पाने, फुले आणि फळे यांच्या उदय आणि परिपक्वतेच्या नमुन्यांची डिजिटल पद्धतीने निरीक्षणे नोंदवून हवामान बदलाचा झाडांवर होणारा परिणाम कसा समजून घेता येतो हे स्पष्ट केले. (Arboriculture Conference)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.