आता लवकरच मेडिकलमध्येही मिळणार कोरोना लस!

72

वाढत्या कोरोना संसर्गादरम्यान कोरोना विरोधी लढ्यात देशाने आणखी एक पाऊल टाकले आहे. देशात कोरोनावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरू आहे. अशापरिस्थितीत लवकरच रुग्णालयांबरोबरच मेडिकल स्टोअर्समध्येही कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसी मिळणार आहेत. या लसींची खुल्या बाजारात विक्री करण्यास परवानगी देण्याची शिफारस केंद्र सरकारच्या विशेष समितीने केली आहे. तज्ज्ञांच्या विशेष समितीची बुधवारी महत्वाची बैठक झाली. यावेळी झालेल्या बैठकीत समितीने कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सिन या लसी खुल्या बाजारात विकण्यास आपली मंजुरी दिली.

खुल्या बाजारातील लसींच्या विक्रीला ग्रीन सिग्नल

कोरोना लसींच्या नियमित मार्केटिंगसाठी मान्यता मिळवण्याच्या हेतूने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांनी देशाच्या औषध महानियंत्रकांकडे (DCGI) अर्ज केले होते. त्यांच्या अर्जाची दखल घेताना तज्ज्ञांच्या विशेष समितीने लसींच्या चाचणीसंदर्भातील कागदपत्रांची पडताळणी केली. त्यानंतर खुल्या बाजारातील लसींच्या विक्रीला ग्रीन सिग्नल दाखवण्यात आला आहे.

(हेही वाचा – ठाकरे सरकारचा 3 जम्बो कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा?)

मेडिकल स्टोअर्सना लस विक्रीची मुभा

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सिन या कोरोना लसींच्या नियमित विक्री करण्यासाठी मान्यता देण्याची शिफारस केली आहे. केंद्र सरकारमधील अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. देशात सध्या या लसींच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आलेली आहे. आता लवकरच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII)आणि भारत बायोटेक या दोन लस उत्पादक कंपन्यांना आपल्या लसी रुग्णालये आणि मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध करून देता येतील. त्यामुळे कोवीन पोर्टलवर नोंदणी झालेल्या रुग्णालयांसह मोडिकलमध्ये लस विक्रीची मुभा असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.