Apple Foldable Phones : ॲपल २०२६ मध्ये आणणार फोल्डेबल फोन

Apple Foldable Phones : ॲपलचा हा फोल्डेबल फोन ७.९ इंचांचा असेल. 

109
Apple Foldable Phones : ॲपल २०२६ मध्ये आणणार फोल्डेबल फोन
  • ऋजुता लुकतुके

सॅमसंग, विवो, ओपो आणि वनप्लस यासारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांनी आपले फोल्डेबल मोबाईल फोन बाजारात आणलेले असताना ॲपल कंपनी मात्र याबाबतीत इतकी वर्ष उदासीन होती. पण, आता कंपनीने आपला फोल्डेबल फोन २०२६ पर्यंत बाजारात आणणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ९ टू ५ मॅक या वेबसाईटने याविषयी वेळोवेळी वार्तांकन केलं आहे आणि अलीकडे त्यांनी या प्रस्तावित फोनविषयी काही गोष्टी उघड केल्या आहेत. (Apple Foldable Phones)

हा फोन ७.९ इंचांचा असेल आणि कंपनी २०.३ इंचांच्या आणखी एका फोल्डेबल उत्पादनावर काम करत असल्याचंही या वेबसाईटने म्हटलं आहे. ॲपलचा फोल्डेबल मोबाईल हा हुआवे मेट एक्सएस २ शी मिळता जुळता असेल. तर मॅकबुकही लिनोवो थिंकपॅड एक्सवन फोल्ड सारखा असेल असा अंदाज आहे. याशिवाय कंपनीच्या आयफोन, आयपॅड आणि मॅकबुकसाठीच्या नवीन ऑपरेटिंग प्रणालीही येऊ घातल्या आहेत आणि याच महिन्यात त्यांची घोषणा होऊ शकते. (Apple Foldable Phones)

(हेही वाचा – Costal Road: मरिन ड्राइव्ह ते वरळी प्रवास होणार सुखकर, ४० मिनिटांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत कसा कराल ?)

इतकंच नाही तर सॅमसंग, गुगल सारख्या कंपन्यांनी यापूर्वीच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रोग्राम आपल्या फोनमध्ये आणले आहेत. याबाबतीतही ॲपल इतर कंपन्यांच्या तुलनेत पिछाडीवर होती. पण, आता चॅट जीपीटीबरोबर केलेली भागिदारी ॲपल कंपनीने जाहीर केली आहे. त्यानुसार, यावर्षाच्या अखेरीस ॲपल उत्पादनांच्या आठव्या पिढीतील ऑपरेटिंग प्रणालीबरोबर ॲपल ग्राहकांना चॅट जीपीटी मोफत वापरता येणार आहे. ॲपलच्या चॅट जीपीटी वापरात सिरीवर हा प्रोग्राम वापरल्यास कंपनीने सुरक्षा आणि गोपनीयताही देऊ केली आहे. (Apple Foldable Phones)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.