Loksabha Speaker : लोकसभा अध्यक्ष पदासाठी एनडीए सरकारमधील प्रमुख घटक पक्ष आग्रही

114
Lok Sabha President भाजपाचाच होणार; भर्तृहरि महताब, डी पुरंदेश्वरी यांच्या नावांची चर्चा

लोकसभेचे अंकगणित आणि सरकार आणि विरोधकांमध्ये सुरू असलेली खडाजंगी पाहता यावेळी सभापतीपद महत्त्वाचे ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमधील दोन प्रमुख घटक पक्ष टीडीपी आणि जेडीयूही या शर्यतीत सामील असल्याचे दिसत आहे.

तसेच ओम बिर्ला यांना दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष (Loksabha Speaker) बनवल्यास आणि त्यांनी या पदावर आपला दुसरा कार्यकाळही पूर्ण केला, तर त्यांच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला जाऊ शकतो. सलग दोनदा निवडून आलेले आणि साडेतीन दशकांपूर्वी कार्यकाळ पूर्ण करणारे बलराम जाखड हे एकमेव लोकसभा अध्यक्ष (Loksabha Speaker) आहेत. जीएम बालयोगी, पीए संगमा यांसारखे नेते दोनदा लोकसभेचे अध्यक्ष (Loksabha Speaker) झाले, पण पूर्ण ५ वर्षांचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला नाही. बलराम जाखड यांनी १९८० ते 1985 आणि १९८५ ते १९८९ या कालावधीत त्यांचे दोन्ही कार्यकाळ पूर्ण केले.

(हेही वाचा – Pune Rain : पुणे शहरात सर्वाधिक पाऊस, १० दिवसांत किती मिलीमीटर पावसाची नोंद? जाणून घ्या…)

तसेच बिर्ला सध्या ते १७व्या लोकसभेचे अध्यक्ष (Loksabha Speaker) आहेत. राजस्थानातील कोटा-बूंदी मतदारसंघातून ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले आहेत. संसदेपूर्वी ते राजस्थान विधानसभेवर तीन वेळा निवडून गेले होते. TDP नेते एन चंद्राबाबू नायडू आणि JDU नेते नितीश कुमार यांना वाटते की त्यांच्या पक्षाला फोडण्याचा प्रयत्न झाल्यास सभापती पद जीवन विमा असेल. तर इंडी आघाडी असेही म्हटले आहे की, अध्यक्षपद टीडीपीकडे गेल्यास ते पाठिंबा देण्यास तयार आहेत. मात्र, मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात स्पीकर असलेले कोटाचे खासदार ओम बिर्ला पुन्हा रिंगणात आहेत. कॅबिनेट मंत्री न झाल्यामुळे अटकळांना वेग आला आहे. दरम्यान, भाजपाचे आंध्र प्रदेश अध्यक्ष डी. पुरंदेश्वरी यांचेही नाव पुढे आले आहे.

डी पुरंदेश्वरी या चंद्राबाबू नायडू यांच्या मेहुणी आहेत. त्यांचे सासरे एन.टी. रामाराव यांची उचलबांगडी केल्याबद्दल त्यांच्यावर टीका होत असताना त्यांनी नायडूंना पाठिंबा दिला होता. अशा स्थितीत त्यांना स्पीकर बनवल्यास नायडू यांच्यावर सॉफ्ट प्रेशर राहील. त्यांचा पक्ष पुरंदेश्वरी यांना विरोध करू शकणार नाही. पुरंदेश्वरी या कम्मा समाजाच्या आहेत. चंद्राबाबू नायडू हेही याच समाजाचे आहेत. आंध्र प्रदेशच्या राजकारणात हा एक प्रभावशाली समुदाय आहे. कम्मा समाज हा टीडीपीचा पारंपारिक मतदार मानला जातो.

हेही पहा –

https://www.youtube.com/watch?v=PiXocN9unRQ 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.