Chandrababu Naidu चौथ्यांदा होणार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, शपथविधी कार्यक्रमात मोदींसह कोण सहभागी होणार? जाणून घ्या…

याआधी पवन कल्याण उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती समोर येत होती.

108
Chandrababu Naidu चौथ्यांदा होणार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, शपथविधी कार्यक्रमात मोदींसह कोण सहभागी होणार? जाणून घ्या...

आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांचे नवे सरकार स्थापन होणार आहे. बुधवारी , १२ जूनला चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यासंदर्भात चंद्राबाबू नायडू यांनी विजयवाडा येथील ए कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एनडीएच्या सर्व १६४ आमदारांसोबत बैठक घेतली. यावेळी चंद्राबाबू नायडूंच्या मंत्रिमंडळात एकूण २५ मंत्री असतील. यामध्ये टीडीपीचे १९, जनसेनेचे ४ आणि भाजपाचे २ मंत्री असणार आहेत. (Chandrababu Naidu )

लोकसभा निवडणुकीसह झालेल्या १७५ विधानसभा जागांच्या आंध्र प्रदेश विधानसभेत टीडीपीसोबत असलेल्या एनडीएने एकतर्फी विजय मिळवला होता. या निवडणुकीत टीडीपीचे १३५ आमदार, अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेनेचे २१ आमदार आणि भाजपाचे ११ आमदार निवडून आले आहेत. दरम्यान, बैठकीनंतर टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू म्हणाले, “भाजपा, जनसेना आणि टीडीपीच्या सर्व आमदारांनी एनडीए सरकारमध्ये आंध्र प्रदेशचा पुढील मुख्यमंत्री होण्यासाठी मला संमती दिली आहे.” (Chandrababu Naidu )

(हेही वाचा –Pune Rain : पुणे शहरात सर्वाधिक पाऊस, १० दिवसांत किती मिलीमीटर पावसाची नोंद? जाणून घ्या… )

विजयवाडा विमानतळाजवळ मुख्यमंत्रिपदाची शपथ
दरम्यान, टीडीपीचे अध्यक्ष अच्चन नायडू, भाजपाचे पुरंदेश्वरी आणि जनसेनेचे पवन कल्याण हे राज्यपालांची भेट घेणार आहेत. एनडीए विधीमंडळाचा नेता निवड करण्यात आल्याचा प्रस्ताव राज्यपालांना दिला जाणार आहे. यानंतर चंद्राबाबू नायडू राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्राबाबू नायडू बुधवारी सकाळी ११.२७ वाजता विजयवाडा विमानतळाजवळ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी कार्यक्रमात पंतप्रधान मोदीही सहभागी होणार आहेत. (Chandrababu Naidu )

पुत्र नारा लोकेश मंत्री होण्याची शक्यता
याआधी पवन कल्याण उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती समोर येत होती, मात्र पवन कल्याण हे अभिनेते असल्यामुळे त्यांनी अनेक चित्रपट साइन केले आहेत. अशा परिस्थितीत ते सध्या चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे समजते. यावेळी चंद्राबाबू नायडू यांचे पुत्र नारा लोकेश हेसुद्धा मंत्री होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आजच्या बैठकीनंतर चंद्राबाबू नायडू यांच्या घरी आणखी एक बैठक होणार आहे, ज्यामध्ये नायडू मंत्रिमंडळाचा भाग असणाऱ्या आमदारांनाच बोलावले जाईल, असे म्हटले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.