Shivaji Park Pollution : शिवाजी पार्कमध्ये पुन्हा एकदा ‘धुळ’वड, तज्ज्ञ सल्लागाराची लवकरच नेमणूक

पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा दादर मधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील (शिवाजी पार्क) धुळीच्या समस्येने तोंड वर काढले आहे.

28
Shivaji Park Pollution : शिवाजी पार्कमध्ये पुन्हा एकदा ‘धुळ’वड, तज्ज्ञ सल्लागाराची लवकरच नेमणूक
Shivaji Park Pollution : शिवाजी पार्कमध्ये पुन्हा एकदा ‘धुळ’वड, तज्ज्ञ सल्लागाराची लवकरच नेमणूक

पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा दादर मधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील (शिवाजी पार्क) धुळीच्या समस्येने तोंड वर काढले आहे. धुळीच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी अद्यापही प्रयत्न केले गेले नसून या धुळीच्या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक करुन, त्यांच्या सल्ल्याने प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. (Shivaji Park Pollution)

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार यांना छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील स्थानिक नागरिकांची भेट घेवून मैदानातील धूळ प्रदूषणाबाबत पुन्हा चर्चा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, उपआयुक्त बिरादार यांनी शुक्रवारी २७ ऑक्टोबर २०२३ रोजी शिवाजी पार्कमधील स्थानिक नागरिकांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तसेच महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यावेळी, या मैदानातील लाल माती काढून टाकावी अशी विनंती नागरिकांनी याप्रसंगी केली. (Shivaji Park Pollution)

New Project 2023 10 28T195552.648

यावेळी बोलतांना बिरादर यांनी, प्रतिवर्षाप्रमाणे ६ डिसेंबर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या अनुयायांची छत्रपती शिवाजी महाराज मैदानात व्यवस्था करण्यात येते. त्याची पूर्वतयारी कामे लवकरच सुरु होतील. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनाचे कामकाज झाल्यानंतर धूळ प्रदूषण विषयक कामे हाती घेण्यात येतील, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. (Shivaji Park Pollution)

(हेही वाचा – Sharad Pawar : मोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखावी…शरद पवारांचे प्रत्युत्तर)

तसेच कायमस्वरुपी धूळ प्रदूषण रोखण्याकरिता कामे करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक केली जाईल. या सल्लागारामार्फत सुचविण्यात आलेल्या सूचना तथा उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल. अशा मोठ्या स्वरुपाचे होणारे काम विविध खात्यांचा जसे की, पर्यावरण, इमारत बांधकाम, पर्जन्य जल संचयन, मालमत्ता विभाग, उपवास्तुशास्त्रज्ञ (विकास नियोजन), पुरातन वारसा अर्थात हेरिटेज, उद्यान विभाग इत्यादी) समावेश करुन त्यांच्या अभिप्रायाप्रमाणे उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे. (Shivaji Park Pollution)

या मैदानासाठी महानगरपालिकेमार्फत तुषार सिंचन प्रणाली प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पामध्ये पर्जन्य जल पुनर्वापर (रेन वॉटर हार्वेस्टिंग) प्रणाली वापरून ३५ नवीन रिंग विहिरी तयार करण्यात आल्या. मैदान समतल करण्यात आले. यासह विविध कामे स्थानिक रहिवाशांसोबत वेळोवेळी झालेल्या बैठकीन्वये व तज्ज्ञ सल्लागारांच्या सल्ल्याने करण्यात आले आहे. सद्यस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये प्रतिदिन पाणी फवारण्याकरीता सुमारे २,९०,००० लीटर पाण्याची आवश्यकता असते. मैदानावरील धूळ प्रदूषण थांबवून स्थानिक रहिवाशांना धुळीचा त्रास होऊ नये म्हणून सदर मैदानात असलेल्या ३५ रिंगवेलमधील उपलब्ध पाणी संपूर्ण मैदानात फवारण्यात येते. त्यासोबतच मैदानावरील हिरवळीचे आच्छादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. (Shivaji Park Pollution)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.