Google Blue Tick : आता गुगल सुद्धा देणार ‘ब्लू टिक’

फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर नंतर आता गुगल सुद्धा वापरकर्त्यांना ब्लू टिक देणार आहे.

127
Google Blue Tick
Google Blue Tick : आता गुगल सुद्धा देणार 'ब्लू टिक'

काही महिन्यांपूर्वी एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतले होते. तेव्हापासून या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अनेक बदल करण्यात आले आहे. यातील काही बदल युजर्सच्या पसंतीस उतरेल तर काही बदलांवर युजर्सनी टीका केली. त्यामधील एक महत्त्वाचा बदल म्हणजे ‘ब्लू टिकसाठी (Google Blue Tick) शुल्क आकारणे’. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर नंतर आता गुगल सुद्धा वापरकर्त्यांना ब्लू टिक देणार आहे.

सशुल्क की नि:शुल्क ?

४ मे २०२३ रोजी ट्विटरवर गुगलने (Google Blue Tick) या संबंधी एक पोस्ट शेअर केली होती. त्यानुसार ब्लू टिकची विशेष सुविधा सध्या फक्त ईमेल वापरकर्त्यांना मिळणार आहे. ईमेल पाठवणाऱ्या वापरकर्त्यांची योग्य ओळख होण्यासाठी तसेच फ्रॉड ईमेल आयडीवरून पाठवण्यात येणारा मेसेज ओळखण्यासाठी या फिचरचा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे हे फिचर नि:शुल्क आहे.

काय आहे फीचर?

गुगल वर्कशॉप, जी सूट बेसीक आणि बिझनेसच्या ग्राहकांना (Google Blue Tick) हे फिचर मिळणार आहेत. यात ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीच्या नावापुढे एक ब्लू टिक दिसणार आहे. ज्या कंपन्यांनी ब्रँड इंडिकेटर फॉर मेसेज आयडेंटिफिकेशन हे फिचर घेतले आहे, त्यांच्या नावापुढे ही ब्लू टिक दिसणार आहे.

पण याचा फायदा काय? 

– ईमेलद्वारे होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार कमी होतील.
– कंपनीचा खरा आयडी कोणता आणि फ्रॉड आयडी कोणता हे लक्षात येईल. (Google Blue Tick)

ब्लू टिक (Google Blue Tick) सर्व्हिस लवकरच पर्सनल गुगल अकाउंट असणाऱ्यांना दिली जाणार आहे. मात्र ही सर्व्हिस कधी उपलब्ध होईल याबद्दल सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.