BMC : मुंबईला विद्रुप करणाऱ्यांवर आणि नियम न पाळणाऱ्या बांधकामांवर होणार कारवाई

महानगरपालिकेच्या वतीने वाहन आधारित धूळ नियंत्रण यंत्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. आजमितीला संपूर्ण मुंबई महानगरात मिळून सुमारे ६०० किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करुन धुवून काढण्यात येत आहेत.

879
BMC Schools : महापालिकेच्या शाळांमध्ये बसवणार ३६५४ जेलफोम फायर स्प्रेची अग्निशमन उपकरणे
BMC Schools : महापालिकेच्या शाळांमध्ये बसवणार ३६५४ जेलफोम फायर स्प्रेची अग्निशमन उपकरणे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या निर्देशानुसार मुंबईत यापुढे दररोज १ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करुन धुवून काढण्याचे नियोजन आहे. त्‍यासाठी अतिरिक्‍त मनुष्‍यबळ, पाण्‍याचे टँकर व इतर संयंत्र नेमले जावेत. तसेच, कोठेही अनधिकृत बॅनर्स, जाहिरात फलक, पोस्टर्स दिसल्यास त्यावर कारवाई करावी, याबरोबरच हवेची गुणवत्‍ता खालावण्‍यास कारणीभूत ठरणाऱ्या बांधकाम प्रकल्‍पांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देशही महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक डॉ. चहल (Iqbal Singh Chahal) यांनी दिले आहेत. (BMC)

मुंबईत ३ डिसेंबर २०२३ पासून दर आठवड्यात एक दिवस प्रत्‍येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम (Deep cleaning drives) राबविण्‍यात येत आहे. याच्या पूर्वतयारीचा आढावा घेवून यथोचित निर्देश देण्यासाठी महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी सर्व संबंधित खात्यांची गुरुवारी २८ डिसेंबर २०२३ बैठक घेतली. अतिरिक्‍त आयुक्‍त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्‍यासह सर्व संबंधित सहआयुक्‍त, उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त, खातेप्रमुख बैठकीस उपस्थित होते. (BMC)

दरदिवशी एक हजार किलोमीटरचे रस्ते पाण्याने धुवा

यावेळी बोलतांना चहल यांनी, मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेली बांधकामे, विकास प्रकल्पांची कामे यातून पसरणारी धूळ तसेच एकूणच वायू प्रदूषण (Air pollution) रोखण्यासाठी महानगरपालिकेने उपाययोजना केल्या आहेत. त्यासोबतीला स्वच्छता मोहिमेतून पाण्याची फवारणी करून रस्ते स्वच्छ केले जात आहेत. महानगरपालिकेच्या वतीने वाहन आधारित धूळ नियंत्रण यंत्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. आजमितीला संपूर्ण मुंबई महानगरात मिळून सुमारे ६०० किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करुन धुवून काढण्यात येत आहेत. त्यासाठी पाण्याचे १२१ टँकर आणि इतर संयंत्र, मनुष्यबळ कार्यरत आहेत. आता यापुढे दररोज एक हजार किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करुन पाण्याने धुवायचे उद्दिष्ट ठरवले आहे, त्यादृष्टीने काटेकोरपणे नियोजन करावे, असेही आयुक्‍त चहल (Iqbal Singh Chahal) यांनी नमूद केले. (BMC)

आवश्यकता भासल्यास त्या बांधकामाप्रकरणी पोलिसांत तक्रार

वायू प्रदूषण (Air pollution) मुक्तीसाठी महनगरपालिकेने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. सर्व संबंधित यंत्रणांसाठी ही मार्गदर्शक तत्वेही बंधनकारक आहेत. त्यांचे पालन न करणाऱ्या संबंधितांवर सक्त कारवाई करावी. जे बांधकाम प्रकल्प अद्यापही उपाययोजना करण्याकामी टाळाटाळ करत असतील त्यांना कायदेशीर नोटीस बजावावी, कामे थांबवण्याची सूचना द्यावी. आवश्यकता भासल्यास पोलिसात तक्रार नोंदवा, असेही आयुक्त चहल (Iqbal Singh Chahal) यांनी स्पष्ट केले. (BMC)

(हेही वाचा – Deep Cleaning Drive : मुंबईत यंदाचा थर्टी फर्स्ट साजरा होणार स्वच्छतेद्वारे)

बॅनर हटवताना कुणाचाही मुलाहिजा बाळगू नका

मुंबई महानगर स्वच्छ, सुंदर करण्याच्या उपाययोजना राबवताना महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर्स हटवण्याची कारवाई करावी. अवैध फलकांवर कारवाईसाठी कायमस्वरूपी पथक नेमावे. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कारवाई करावी, असे सक्‍त निर्देशही आयुक्तांनी (Iqbal Singh Chahal) दिले. (BMC)

मुंबईच्या स्वच्छतेचे मॉडेल देशपातळीवर नावाजले जावे

महानगरपालिकेने हाती घेतलेले संपूर्ण स्‍वच्‍छता अभियान (Deep cleaning drives) आता शासनाकडून राज्‍य पातळीवर राबविले जाणार आहे. स्‍वच्‍छतेचे मुंबई मॉडेल यापुढे देश पातळीवर देखील नावाजले पाहिजे, अशी भावना राखून त्‍यासाठी पूर्ण क्षमतेनिशी कार्यरत रहावे, अशी अपेक्षादेखील महानगरपालिका आयुक्‍तांनी अखेरीस व्‍यक्‍त केली. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.