Accident : आनंदाच्या क्षणांवर काळाचा घाला; पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात

81
Nepalमधील फेवा सरोवरात कार कोसळली, २ भारतीय तरुणांचा मृत्यू; २ जखमी
Nepalमधील फेवा सरोवरात कार कोसळली, २ भारतीय तरुणांचा मृत्यू; २ जखमी
  • प्रतिनिधी

Accident          ​लग्नकार्याचा आनंद आणि उत्साहाने भरलेल्या एका प्रवासाचा शेवट अत्यंत सुन्न करणाऱ्या भीषण दुर्घटनेत झाला आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघर नजीकच्या धानीवरी येथे वऱ्हाडाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला भीषण अपघात झाला. एका भरधाव कंटेनरने या ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या या थरारात तब्बल १२ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. एकाच क्षणात १२ जणांचे प्राण गेल्याने संपूर्ण परिसरात आणि नातेवाईकांमध्ये एकच आक्रोश पाहायला मिळत आहे. (Accident)

(हेही वाचा – ‘प्रेमाने ऐकलं तर ठीक, नाहीतर…’ मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा; रस्त्यावरील नमाज पठणाबाबत CM Yogi Adityanath यांनी दिला थेट इशारा)

​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या दुर्दैवी ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच तब्बल १०० हून अधिक वऱ्हाडी प्रवास करत होते. लग्न आटोपून आनंदाच्या वातावरणात सर्वजण घरी परतत असतानाच धानीवरी गावाजवळ मृत्यूने त्यांच्यावर झडप घातली. कंटेनर आणि ट्रकची टक्कर इतकी भीषण होती की, ट्रकचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता आणि चहूबाजूला रडण्याचा व मदतीसाठी पुकारणाऱ्यांचा टाहो ऐकू येत होता. (Accident)

(हेही वाचा – Dowry Death : ११ लाख रुपये रोख, ५० लाखांचे दागिने, स्कॉर्पिओ देऊनही विवाहितेचा घेतला बळी?)

​स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना तातडीने जवळच्या कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतकांचा आकडा आणखी वाढण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या काळ्याकुट्ट अपघातामुळे आनंदाचे रूपांतर एका क्षणात विलापात झाले आहे. (Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.