Pune Fire : पुण्यातील बिझनेस हबमध्ये लागली भीषण आग

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सतत कुठे ना कुठेतरी आग लागण्याच्या घटना घडत आहेत.

41
Pune Fire : पुण्यातील बिझनेस हबमध्ये लागली भीषण आग

पुण्यातल्या विमाननगर, हिंजवडी परिसरात मोठ-मोठे आयटी बिझनेस हब आहेत. अशातच मंगळवार ९ मे रोजी दुपारी पुण्यातल्या विमाननगर परिसरातील आयटी बिझनेस हबमध्ये भीषण आग (Pune Fire) लागली आहे. आग लागल्याची माहिती समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या असून त्यांच्याकडून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीमागचे (Pune Fire) मुख्य कारण असून समजू शकलेले नाही; मात्र या आगीमुळे बरेच आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

(हेही वाचा – Pune Fire : वाघोली येथील एका गोदामाला भीषण आग)

आग लागली तेव्हा त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे काम सुरू होते. आग (Pune Fire) लागल्याचे समजताच एकच गोंधळ उडाला. त्यामुळे अनेकांची पळापळ सुरु झाली. अग्निशमन दलाकडून दोन हजार कर्मचारी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश आले आहे.

मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान

या घटनेत (Pune Fire) कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरीही आर्थिक हानी मात्र मोठ्या प्रमाणावर झाली आहे. आगीमुळे आयटी हबचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते.

पुण्यात अग्नितांडव सुरूच

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सतत कुठे ना कुठेतरी आग लागण्याच्या घटना घडत आहेत. शुक्रवार ५ मे रोजी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास वाघोली, उबाळे नगर येथे “शुभ सजावट” या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला भीषण आग (Pune Fire) लागली होती. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.