Veer Savarkar : भारतातली पहिली अंदमान युवा यात्रा; वीर सावरकर समजून घेण्यासाठी युवकांना संधी

२९ मे ते ४ जून या दरम्यान ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

129
भारतातली पहिली अंदमान युवा यात्रा
भारतातली पहिली अंदमान युवा यात्रा

स्वातंत्र्यवीर सावरकर Veer Savarkar यांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ठिकाणी मरण यातना सहन केल्या, त्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार असलेले अंदमान आणि सेल्युलर जेल सावरकर प्रेमींसाठी तीर्थक्षेत्र आहेच, पण समस्त भारतीयांसाठी राष्ट्रभावना वृद्धिंगत करणारे हे ठिकाण आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर तरुणांनी जाणून घेणे आवश्यक आहे, म्हणूनच प्रथमच भारतातील पहिली अंदमान युवा यात्रा आयोजित करण्यात आली आहे .

२९ मे ते ४ जून या दरम्यान ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. १६ ते ३० वयातील तरुणासाठीच ही खास यात्रा असणार आहे. या यात्रेच्या दरम्यान तरुणांना ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांच्या समवेत वीर सावरकर Veer Savarkar समजून घेता येणार आहेत. पहाटे उठणे त्यानंतर तेथील समुद्री बेट फिरणे, तसेच तरुणांना त्यांच्या वयातील सर्व समुद्री खेळ खेळवले जाणार आहेत, त्यानंतर संध्याकाळी वीर सावरकर समजावून सांगितले जाणार आहेत, असे वीर सावरकर अभ्यासक पार्थ बाविस्कर म्हणाले. या अंदमान यात्रेला जाण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क करा – ९९७००७७२५५, ९७३०१४७२५५.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.